कटंगीटोला येथे दोन गटांत हाणामारी, सहा जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2022 18:24 IST2022-12-24T18:23:26+5:302022-12-24T18:24:01+5:30

एका गटाने रॉडने मारले : दुसऱ्या गटाचा कुऱ्हाडीने हल्ला

Clash between two groups in Katangitola, case registered against six persons | कटंगीटोला येथे दोन गटांत हाणामारी, सहा जणांवर गुन्हा दाखल

कटंगीटोला येथे दोन गटांत हाणामारी, सहा जणांवर गुन्हा दाखल

गोंदिया : रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कटंगीटोला गोंडीटोला येथे २२ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता दोन गटांत झालेल्या हाणामारीत सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

चेतना संतोष राऊत (वय ३५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे पती संतोष बाबूराव राऊत (४०) हे दारू पिऊन शिवीगाळ करीत असताना आरोपी शुभम दुलीचंद मस्करे (३२), दुलीचंद मस्करे (५५) व कमला दुलीचंद मस्करे (५०, सर्व रा. कटंगीटोला गोंडीटोला) या तिघांनी त्यांना थापडबुक्क्यांनी व लोखंडी राॅडने मारून जखमी केले. या प्रकरणात संतोष बाबूराव राऊत (४०), वेदांत संतोष राऊत (२०) व चेतना संतोष राऊत (३५, सर्व रा. कटंगीटोला) यांना मारहाण करून गंभीर जखमी केले. या घटनेसंदर्भात रामनगर पोलिसांनी भादंविच्या कलम ३२४, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तपास सहायक फौजदार बनकर करीत आहेत. तर दुसऱ्या गटातील आरोपी संतोष राऊत, वेदांत राऊत व चेतना राऊत या तिघांनी शुभम दुलीचंद मस्करे (३२) व दुलीचंद मस्करे (५५) या बापलेकांना कुऱ्हाडीने मारून जखमी केले. आरोपींवर रामनगर पोलिसांनी भादंविच्या कलम ३२३, ३२४, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास सहायक फौजदार बनकर करीत आहेत.

Web Title: Clash between two groups in Katangitola, case registered against six persons