रात्री घराच्या दारावर पेट्रोल टाकून लावली आग, चिरेखनी येथील घटना
By नरेश रहिले | Updated: February 4, 2024 18:09 IST2024-02-04T18:09:09+5:302024-02-04T18:09:27+5:30
नागपूरच्या एकावर गुन्हा दाखल

रात्री घराच्या दारावर पेट्रोल टाकून लावली आग, चिरेखनी येथील घटना
नरेश रहिले/गोंदिया : चिरेखनी येथील चत्रुघन परमानंद सुरणकर यांच्या दारावर पेट्राेल टाकून आग लावण्याचा प्रकार २ फेब्रुवारी रोजी रात्री ११:३० वाजता उघडकीस आला.
तिरोडा तालुक्याच्या चिरेखनी येथील चत्रुघन परमानंद सुरणकर (३३) हे शुक्रवारी रात्री घरी असताना त्यांना पेट्रोलचा वास आला. त्यांनी समोरील दार उघडले असता त्यांच्या दारावर पेट्रोल टाकून घरचा दरवाजा जाळला असल्याचे त्यांनी पाहिले. दुसरा दरवाजा उघडून पाहिल्यावर दुसऱ्या दाराजवळ माचिस आणि बिसलेरीची बॉटल आढळली.
त्यांनी आजबाजूला शोध घेतल्यावर त्यांना कोणी दिसले नाही. घराला आग लावण्याचा हा प्रयत्न असावा अशी तक्रार करण्यात आली. या प्रकरणात संशयाच्या आधारे आरोपी अमित गणेश भेलावे (२६) रा. नागपूर याच्याविरुध्द तिरोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक दलालवाड करीत आहेत.