ट्रकखाली येऊन दुचाकीस्वार ठार, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 16:35 IST2023-06-08T14:37:53+5:302023-06-08T16:35:50+5:30
तिरोडा तालुक्यातील घटना

ट्रकखाली येऊन दुचाकीस्वार ठार, गुन्हा दाखल
तिरोडा (भंडारा) : मुंडीकोटा बस स्टॉप जवळ झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला. ही घटना आज (दि. ८) सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली. ट्रक क्र. एम एच 40 बी जी 8001 खाली येऊन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्यास तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
भीमराव बालकृष्ण शेंडे (४७) रा. सेलोटपार हे दुचाकीने (MH36 - 5189) मुंडिकोटा येथुन किराणा सामान घेऊन परत येत असताना बस स्टॅन्डजवळ टी पॉईंट येथे तुमसर पडून तिरोड्याकडे वेगात येणाऱ्या टिप्परने दुचाकीला मागून जोरात धडक दिली. रुग्नवाहिकेने उपजिल्हा रुग्णालयात तिरोडा येथे दाखल केले असता उपचार दरम्यान तो मरण पावला. टिप्पर चालकाच्या विरोधात तिरोडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.