ब्युटीपार्लरसाठी मिळणार अडीच लाख; १५ टक्के सबसिडीचा घेता येईल फायदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 17:14 IST2025-01-27T17:14:06+5:302025-01-27T17:14:44+5:30
लघु उद्योगांच्या उत्थानासाठी प्रयत्न : जिल्हा उद्योग केंद्रात प्रस्ताव

Beauty parlors will get Rs 2.5 lakh; 15 percent subsidy can be availed
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यात सूक्ष्म व्यवसाय किंवा उद्योग सुरू करण्यासाठी दीड लाख रुपयांपासून ते अडीच लाखांपर्यतची रक्कम सुशिक्षित बेरोजगारांना बँकेच्या माध्यमातून कर्ज स्वरूपात अर्थसाहाय्य दिले जाते.
यात शासनाद्वारे १५ टक्क्यांपर्यंत सबसिडीने उपलब्ध करून दिली जाते. या योजनेचा सर्वाधिक लाभ महिलांनी ब्युटीपार्लर, तर पुरुषांनी सलून टाकण्यासाठी घेतला आहे. यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या नावे ऑनलाइन अर्ज, एक पासपोर्ट फोटो, आधार कार्ड, जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, प्रकल्प अहवाल, पॅन कार्ड ही कागदपत्रे या प्रस्तावासाठी तयार करून घेणे आवश्यक आहेत.
मंजुरीसाठी पाठपुरावा
जिल्हा उद्योग केंद्राकडून नवउद्योजकांचे प्रस्ताव तातडीने मंजूर करण्यात येतात. हे प्रस्ताव पुढे कर्ज प्रकरणासाठी बँकांकडे जातात. डीआयसीकडून पाठपुरावा केला जातो. डाळ मिल, ऑइल मिल, बेकरी उत्पादन, गूळ उत्पादन, विविध प्रकारचे मसाले तयार करणे, दागिने तयार करणे यांसह इतर उत्पादनांचा समावेश होतो. यासाठी पाठपुरावा केला जात आहे.
जिल्ह्यातून अनेक प्रस्ताव
गोंदिया जिल्हा उद्योग केंद्राला मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमासाठी टार्गेट दिले आहे.
अडीच लाखांपर्यंत कर्ज
या प्रस्तावांसाठी दीड लाखापासून ते अडीच लाखांपर्यंत विविध प्रस्ताव जिल्हा उद्योग केंद्राकडे प्राप्त झालेले आहेत. मार्च अगोदर हे प्रस्ताव बँका मंजूर करतील, अशी अपेक्षा व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
१५ टक्के शासनाची सबसिडी
नवीन उद्योजकांना केवळ दहा टक्के रक्कम भरावी लागते. उर्वरित शासनाकडून देय अनुदान १५ टक्के आणि ७५ टक्के हे बँक कर्ज, अशा पद्धतीने प्रकल्प उभा राहतो. ग्रामीण भागासाठी लाभार्थीला दहा टक्के रक्कम भरावी लागणार, १५ टक्के शासकीय अनुदान, तर ६५ टक्के बँकेचे कर्ज राहणार आहे.
ब्युटीपार्लर, सलूनचेही सर्वाधिक प्रस्ताव
शहर व जिल्ह्यात ब्युटीपार्लरचे प्रस्ताव महिलांनी सादर केले आहेत, तर सलूनसाठी प्रस्ताव पुरुषांनी सादर केले आहेत.