धावत्या स्कुटीला अचानक आग, पाहता-पाहता जळून खाक

By अंकुश गुंडावार | Updated: July 20, 2023 10:57 IST2023-07-20T10:54:50+5:302023-07-20T10:57:09+5:30

सुदैवाने दाम्पत्य सुखरुप बचावले

A moving scooty suddenly catches fire and burnt | धावत्या स्कुटीला अचानक आग, पाहता-पाहता जळून खाक

धावत्या स्कुटीला अचानक आग, पाहता-पाहता जळून खाक

तिरोडा (गोंदिया) : आज (दि. २०) सकाळी सव्वा दहा वाजता शिंगाडा तलाव काठावरील रस्त्याने जात असताना स्कुटीने अचानक पेट घेतला. पाहता-पाहता आगीने वाहन आपल्या कवेत घेतले व संपूर्ण स्कूटी जळून खाक झाली. 

शास्त्री वार्ड तिरोडा निवासी सौ. नूतन सुकलाल बिसेन या जिल्हा परिषद शाळा विहिरीगाव येथे शिक्षिका असून त्या आपल्या पतीसोबत शाळेकडे  शिंगाडा तलाव काठावरील रस्त्याने जात होत्या. दरम्यान अचानक स्कुटीतून धूर निघू लागला. प्रसंगावधान लक्षात घेत सदर दाम्पत्य वाहन तिथेच सोडून बाजूला झाले. इतक्यात क्षणात गाडीने पेट घेतला व पाहता-पाहता पूर्ण स्कूटी जळून खाक झाली. सुदैवाने वेळीच वाहन बाजुला करत दाम्पत्य बाजुला झाल्याने दोघेही सुखरुप बचावले. 
 

Web Title: A moving scooty suddenly catches fire and burnt