तिरोड्यातील जवानाचा शिमला येथे हृदयविकाराने मृत्यू 

By अंकुश गुंडावार | Updated: October 3, 2023 17:07 IST2023-10-03T17:05:09+5:302023-10-03T17:07:03+5:30

सकाळी ते मैदानावर कवायत करीत असताना त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला

A jawan from Tiroda died of cardiac arrest in Shimla | तिरोड्यातील जवानाचा शिमला येथे हृदयविकाराने मृत्यू 

तिरोड्यातील जवानाचा शिमला येथे हृदयविकाराने मृत्यू 

गोंदिया : सेनेत कार्यरत जवानाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.३) सकाळी हिमाचल प्रदेश शिमला येथे घडली. देवीप्रसाद लिल्हारे रा. महालगाव, ता. तिरोडा, जि. गोंदिया असे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालेल्या जवानाचे नाव आहे. 

देवीप्रसाद हे तिरोडा तालुक्यातील महालगाव येथील रहिवासी असून ते मागील काही वर्षांपासून हिमाचल प्रदेश येथील शिमला येथे भारतीय सैन्य दलात हवालदार पदावर कार्यरत होते. मंगळवारी सकाळी ते मैदानावर कवायत करीत असताना त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला. यातच त्यांची प्राणज्योत मालवली.

शासकीय सोपस्कार पार पाडल्यानंतर बुधवारी (दि.४) ऑक्टोबर रोजी त्यांचा मृतदेह त्यांच्या स्वगावी महालगाव आणण्यात येणार आहे. यानंतर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.

Web Title: A jawan from Tiroda died of cardiac arrest in Shimla