डोक्यात फावडे घालून ५५ वर्षीय पत्नीचा खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 16:27 IST2024-10-04T16:27:01+5:302024-10-04T16:27:36+5:30
Gondia : खून केल्यानंतर पतीचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण

A 55-year-old wife was killed by a shovel on her head
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : डुग्गीपार पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या खजरी येथील साधना भीमराव सोनटक्के (५५) या महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन नवऱ्याने फावड्याने तिच्या डोक्यावर मारून खून केल्याची घटना १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडली. या घटनेसंदर्भात २ ऑक्टोबर रोजी डुग्गीपार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
साधना भीमराव सोनटक्के (५५), रा. खजरी असे मृत पत्नीचे नाव आहे. तर भीमराव धर्मा सोनटक्के (६८) रा. खजरी असे आरोपी पतीचे नाव आहे. आरोपी भीमराव सोनटक्के हा नेहमी आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. तिला एकटी कुठेही बाहेर जाऊ देत नव्हता. साधनासोबत तो १ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता सायकलने शेतात गेला. आरोपीने शेतात ठेवलेल्या फावड्याने पत्नीच्या डोक्यावर मारून खून केला. या घटनेसंदर्भात डुग्गीपार पोलिसांनी आरोपीवर भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस निरीक्षक काळे करीत आहेत.