कटंगी जलाशयात 20 वर्षीय विवाहित युवतीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 19:03 IST2022-09-01T19:03:05+5:302022-09-01T19:03:44+5:30

सदर विवाहित युवतीने उडी घेतल्याचे आजूबाजूला असलेल्यांच्या लक्षात येताच आपत्ती निवारण शोध पथकाला व गोरेगाव पोलिसांना माहिती देण्यात आली

20-year-old married woman commits suicide in Katangi reservoir of gondia | कटंगी जलाशयात 20 वर्षीय विवाहित युवतीची आत्महत्या

कटंगी जलाशयात 20 वर्षीय विवाहित युवतीची आत्महत्या

अंकुश गुंडावार

गोरेगाव (गोंदिया)- येथील जगत कला वाणिज्य व हरिहरभाई पटेल विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थीनी सौ. कृणाली लोकेश पटले वय 20,राहणार मोहाडी,ता.गोरेगाव या 20 वर्षीय विवाहित महिलेने कटंगी जलाशयात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज 1 सप्टेबंरला गुरूवारी दुपारच्या सुमारास घडली.

सदर विवाहित युवतीने उडी घेतल्याचे आजूबाजूला असलेल्यांच्या लक्षात येताच आपत्ती निवारण शोध पथकाला व गोरेगाव पोलिसांना माहिती देण्यात आली. लगेच पोलिसांनी आपत्ती निवारण पथकाच्या माध्यमातून शोध मोहिम राबवित सदर विवाहित युवतीचा मृतदेह जलाशयातून बाहेर काढले. सदर विवाहित युवती कटंगी  जलाशयापर्यंत कशी आली. आत्महत्या करण्यामागे काय कारण असेल. हत्या की आत्महत्या असे विविध प्रश्न निर्माण झाले असून पोलीसांनी तपास कार्याला सुरुवात केली आहे.

Web Title: 20-year-old married woman commits suicide in Katangi reservoir of gondia