गोव्यात उद्या मतदान, निवडणूक साहित्य घेऊन कर्मचारी १७२५ मतदान केंद्रांवर रवाना
By किशोर कुबल | Updated: May 6, 2024 14:56 IST2024-05-06T14:55:50+5:302024-05-06T14:56:14+5:30
एकूण ११ लाख ७९ हजार ६४४ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. निवडणूक आयोगाने ८० टक्के मतदानाचे उद्दिष्ट ठेवले आहे.

गोव्यात उद्या मतदान, निवडणूक साहित्य घेऊन कर्मचारी १७२५ मतदान केंद्रांवर रवाना
पणजी : लोकसभा निवडणुकीसाठी दोन जागांवर उद्या मंगळवारी ७ रोजी मतदान होत असून आज सकाळीच निवडणूक कर्मचारी ईव्हीएम तसेच व्हिव्हिपीएटी यंत्रे व इतर साहित्य घेऊन १७२५ मतदान केंद्रावर रवाना झाले आहेत.
उद्या सकाळी ७ ते सायंकाळी ६ यावेळी मतदान होईल. त्यासाठी निवडणूक आयोगाने आवश्यक ती सर्व सज्जता ठेवली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी केंद्रीय सुरक्षा दलाच्या बारा तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत. एकूण ११ लाख ७९ हजार ६४४ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. निवडणूक आयोगाने ८० टक्के मतदानाचे उद्दिष्ट ठेवले आहे.
उद्या भरपगारी सुट्टी
दरम्यान, निवडणुकीनिमित्त उद्या ७ रोजी सर्व सरकारी, खाजगी कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी जाहीर करणारी अधिसूचना काढण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठी भूतान, मंगोलिया व इस्रायलमधून पथके आली असून आज सकाळी त्यांनी ताळगांव येथे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर ईव्हीएम यंत्रे वितरणाची व्यवस्था पाहिली तसेच उद्या मतदानाच्या दिवशी ही पथके मतदान केंद्रांवर फिरून कशा प्रकारे मतदान चालते, याचा अभ्यास करणार आहेत.