अर्थसंकल्पातून जनतेचे हित जपले; भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 10:58 IST2026-02-04T10:58:22+5:302026-02-04T10:58:55+5:30
सर्वांच्या हिताची काळजी घेणारा परिपूर्ण असा अर्थ संकल्प दिल्याबद्दल अर्थमंत्री सीतारामन यांचे कौतुक आहे.

अर्थसंकल्पातून जनतेचे हित जपले; भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग नवव्यांदा सादर केलेला अर्थसंकल्प हा अपेक्षेप्रमाणेच विकासाभिमूख असून सामान्यांचे हित साधणारा आहे, असे गौरवोद्गार भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी काढले. ब्ल्यू इकॉनॉमीला चालना देणारा अर्थसंकल्प असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. भाजप मुख्यालयात आज, मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपच्या चार्टड अकाऊंटट विभागाचे प्रमुख जयराम खोलकर उपस्थित होते.
दामू नाईक म्हणाले की, सर्वांच्या हिताची काळजी घेणारा परिपूर्ण असा अर्थ संकल्प दिल्याबद्दल अर्थमंत्री सीतारामन यांचे कौतुक आहे. विकासाला दिशा देणारा हा अर्थ संकल्प आहे. अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा आणि विशेष करून गोव्यासाठी खूप काही देणारा अर्थसंकल्प आहे, असे ते म्हणाले.
नारळ, काजू उत्पादनवाढीसाठी तरतूद तसेच मच्छीमार व्यवसायाला आधार देणारा हा अर्थसंकल्प असून गोव्यासाठी फायदेशीर असल्याचेही ते म्हणाले. अर्थसंकल्पात गोव्याला काहीच देण्यात आले नाही हा काँग्रेसचा दावा दामू नाईक यांनी फेटाळला.
