गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत नागपुरात, नितीन गडकरींच्या प्रचारसभेत घेणार सहभाग
By किशोर कुबल | Updated: April 15, 2024 13:11 IST2024-04-15T13:10:43+5:302024-04-15T13:11:48+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नीतीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या प्रचारासाठी नागपुरात दाखल झाले आहेत. गडकरी हे नागपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत नागपुरात, नितीन गडकरींच्या प्रचारसभेत घेणार सहभाग
- किशोर कुबल
पणजी - गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नीतीन गडकरी यांच्या प्रचारासाठी नागपुरात दाखल झाले आहेत. गडकरी हे नागपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. दुपारी मुख्यमंत्र्यांनी नागपुरात पत्रकार परिषदेत संबोधले. नंतर तेथील व्यापारी आघाडीची बैठक घेतली. दुपारी ३.३० वाजता जाहीर सभेत संबोधतील. सायंकाळी ५.१० वाजता डॉक्टर संमेलतान मार्गदर्शन करतील. सायंकाळी ६ वाजता नवमतदार संमेलनात संबोधतील व सायंकाळी ७ वाजता कार्यकर्ता भेट कार्यक्रमात भाग घेतील.
गोव्यातील भाजप उमेदवारांच्या प्रचाराची धुरा सांभाळत असतानाच मुख्यमंत्री शेजारी कर्नाटक, महाराष्ट्रातही प्रचारात सहभागी होत आहेत. महाराष्ट्रातील स्टार प्रचारकांच्या यादीत त्यांचा समावेश आहे. गेल्या शुक्रवारी १२ रोजी ते कर्नाटकात कारवार दौय्रावर होते. तेथे उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांच्या प्रचारात त्यानी भाग घेतला.
मुख्यमंत्री सावंत यांच्याकडे कर्नाटक तसेच अन्य राज्यांमधील भाजप उमेदवारांच्या प्रचाराची जबाबदारी आहे. गेल्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी त्यांच्यावर तेलंगणा, मध्यप्रदेश, राजस्थान आदी राज्यांची जबाबदारी सोपवली होती. तेव्हा त्यानी या राज्यांचाही दौरा केला होता.