लोकसभा निवडणूक 2024: ‘मिशन पॉलिटिकल रिझर्वेशन’ संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये फूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 16:16 IST2024-04-04T16:15:58+5:302024-04-04T16:16:22+5:30
काही कार्यकर्ते तटस्थ तर काही भाजपच्या पराभवासाठी लढणार

लोकसभा निवडणूक 2024: ‘मिशन पॉलिटिकल रिझर्वेशन’ संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये फूट
पणजी: राजकीय आरक्षण मिळावे या मागणीसाठी स्थापन केलेली एसटी मिशन पॉलिटिकल रिझर्वेशन संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये फुट पडली आहे. संघटनेचे काही कार्यकर्त्यांनी बुधवारी पत्रकार परिषदे घेऊन येत्या निवडणूकीत आम्ही तटस्थ भूमिका बजावणार असे सांगितले. तर या संघटनेचा राजीनामा दिले रामा काणकोणकर रुपेश वेळीप, साेयरु वेळीप यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन आम्ही भाजप उमेदवाराविरोधात काम करणार. राज्यातील १ लाख ८० हजार एटी समाजाची जनता आमच्या सोबत आहे असे म्हटले आहे.
रामा काणकाेणकर म्हणाले, मिशन पॉलिटिकल संघटनेत आता काही आरजी पक्षाचे कार्यकर्ते घुसले आहेत. त्यांनी याला राजकीय वळण दिले आहे. आरजी ही भाजपची बी टीम आहे हे पूर्ण जनतेला माहित आहे. आम्ही गेली २० वर्षे आरक्षणासाठी लढा देत आहोत. आमच्या अनेक सदस्यांनी यासाठी जीवदानही दिले. त्यामुळे आम्ही आमचा हक्क मिळवल्याशिवाय राहणार नाही. आझाद मैदानावर आम्ही उपाेषण केले त्यावेळी हजारो लाेक आझाद मैदानावर जमा झाले होते. एवढे असून आता या संघटनेच्या काही ीसदस्यांनी निवडणूक तटस्थ भूमिका घेतो असे सांगणे हे चुकीचे आहे. आम्ही या संघटनेचा राजीनामा दिला तरी आम्ही आमचे कार्य
सोडणार नाही. आम्ही येत्या निवडणूकीत लाेकांना भाजप विरोधात मते मारायला सांगणार आहे.
भाजपने दक्षिण गोव्यात एसटी समाजाच्या महिला उमेदवाराला उमेदवारी देणार असे सांगितले होते. पण आता भाजपने एका उद्योजक महिलेला उमेदवारी दिली. एसटी समाजाची फसवणूक केली आहे. भाजप प्रत्येकवेळी फसवणूक करत आहे. त्यामुळे आता आम्ही गप्प बसणार नाही असेही यावेळी रामा काणकोणकर म्हणाले.