लोकसभा निवडणुकीतून माघार घ्यावी यासाठी आम्हाला अनेक ॲाफर्स होत्या, मनोज परब यांचा दावा

By किशोर कुबल | Published: May 9, 2024 04:05 PM2024-05-09T16:05:00+5:302024-05-09T16:06:40+5:30

Goa Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीतून माघार घ्यावी यासाठी आम्हाला अनेक ॲाफर्स होत्या परंतु आरजी माघार घेण्यासाठी जन्मलेली नाही. आजवर गोवेकरांनी नेहमीच तडजोडीचे राजकारण पाहिले आहे. आरजी स्वार्थासाठी कधीही अशा तडजोडी करणार नसल्याचे पक्षाचे प्रमुख मनोज परब यांनी स्पष्ट केले.

Goa Lok Sabha Election 2024: We had many affairs to withdraw from the Lok Sabha elections, claims Manoj Parab | लोकसभा निवडणुकीतून माघार घ्यावी यासाठी आम्हाला अनेक ॲाफर्स होत्या, मनोज परब यांचा दावा

लोकसभा निवडणुकीतून माघार घ्यावी यासाठी आम्हाला अनेक ॲाफर्स होत्या, मनोज परब यांचा दावा

- किशोर कुबल 
पणजी - लोकसभा निवडणुकीतून माघार घ्यावी यासाठी आम्हाला अनेक ॲाफर्स होत्या परंतु आरजी माघार घेण्यासाठी जन्मलेली नाही. आजवर गोवेकरांनी नेहमीच तडजोडीचे राजकारण पाहिले आहे. आरजी स्वार्थासाठी कधीही अशा तडजोडी करणार नसल्याचे पक्षाचे प्रमुख मनोज परब यांनी स्पष्ट केले.

पत्रकार परिषदेत त्यांच्यासोबत आमदार वीरेश बोरकर व खजिनदार अजय खोलकर उपस्थित होते. परब म्हणाले कि‘ गोव्यातील निवडणुकांचा ट्रेंड बदलयतोय. प्रचारात जाती, धर्माचे राजकारण केले जाते. धर्म संकटात आहे, असे सांगून मतें मागितली जातात. लोकशाही व भारतीय राज्यघटना बाजुलाच राहिली आहे.’

दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आरजीने उत्तर गोव्यात १८ लाख व दक्षिण गोव्यात १५ लाख मिळून ३३ लाख रुपये खर्च केल्याची माहिती पक्षाने निवडणूक आयोगाला सादर केली आहे.

Web Title: Goa Lok Sabha Election 2024: We had many affairs to withdraw from the Lok Sabha elections, claims Manoj Parab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.