Goa: खलपांशी डिबेटसाठी मी तयार आहे, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिआव्हान

By वासुदेव.पागी | Published: April 18, 2024 02:23 PM2024-04-18T14:23:15+5:302024-04-18T14:24:20+5:30

Goa Lok Sabha Election 2024: कॉंग्रेसचे उत्तर गोव्याचे उमेदवार रमाकांत खलप यांनी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना आव्हान देण्याच्या फंदात पडूच नये. त्यांच्या प्रत्येक मुद्यावर डिबेट करायला मी स्वत: तयार आहे असे प्रतिआव्हान मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी त्यांना दिले आहे. 

Goa: I am ready for Khalpanshi debate, Chief Minister Pramod Sawant's counter challenge | Goa: खलपांशी डिबेटसाठी मी तयार आहे, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिआव्हान

Goa: खलपांशी डिबेटसाठी मी तयार आहे, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिआव्हान

-वासुदेव पागी
पणजी - कॉंग्रेसचे उत्तर गोव्याचे उमेदवार रमाकांत खलप यांनी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना आव्हान देण्याच्या फंदात पडूच नये. त्यांच्या प्रत्येक मुद्यावर डिबेट करायला मी स्वत: तयार आहे असे प्रतिआव्हान मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी त्यांना दिले आहे. 

नाईक यांनी एक खासदार व मंत्री म्हणून गोव्यासाठी काय केले हे सांगावे. आपल्याबरोबर खुल्या डिबेटला यावे असे आव्हान खलप यांनी नाईक यांना दिले होते. या आव्हानाचा उल्लेख करताना मुख्यमंत्री यांनी सांगितले की खलप यांनी केंद्रीय मंत्री नाईक यांना आव्हान देण्याच्या फंदात पडूच नये. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपल्याकडे आहे असे ते म्हणाले. त्यांना जे काही विचारायचे असेल ते आपल्याला विचारू शकतात. केवळ अलिकडे आपण जरा व्यस्त असल्यामुळे वेळ  मिळत नाही. परंतु गोव्यातील निवडणुका उरकल्यानंतर आपल्याकडे वेळ उपलब्द असेल. त्यमुळे ७ मे नंतर केव्हाही ते आपल्याला खुल्या चर्चेसाठी  बोलवू शकतात असे ते म्हणाले. म्हापसा अर्बन बँकचा उल्लेख न करता ते म्हणाले की हजारो लोकांचे पैसे बुडविले आहेत, भागदारकांचे पैसे बुडविले आहे याचे उत्तर त्यांना अगोदर द्यायला हवे.

यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि दक्षिण गोव्याच्या भाजपच्या उमेदवार पल्लवी धेम्पे  तसेच प्रदेशाध्यक्ष खासदार सदानंद तनावडे पत्रकार परिषदेला उपस्थित होते. दोन्ही जिल्ह्यात यंदा भाजपचाच उमेदवार जिंकत असल्याचा दावा मुख्यमंत्र्यानी केला आहे.

 

Web Title: Goa: I am ready for Khalpanshi debate, Chief Minister Pramod Sawant's counter challenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.