अमित शाह यांची गोव्यात सभा; पंतप्रधान मोदींच्या सभेची शक्यता मावळली?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2024 09:16 IST2024-04-19T09:16:14+5:302024-04-19T09:16:50+5:30

गोव्यात प्रचारासाठी येणाऱ्या भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचा समावेश आहे. 

amit shah rally in goa for lok sabha election 2024 | अमित शाह यांची गोव्यात सभा; पंतप्रधान मोदींच्या सभेची शक्यता मावळली?

अमित शाह यांची गोव्यात सभा; पंतप्रधान मोदींच्या सभेची शक्यता मावळली?

लोकमत न्यूज नेटर्वक पणजी : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दि. २४ रोजी म्हापसा येथे जाहीर सभा होणार आहे. गोव्यात प्रचारासाठी येणाऱ्या भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचा समावेश आहे. 

पंतप्रधानांची गोव्यात सभा घेण्यासाठी पक्षाकडून प्रयत्न चालविले असले तरी आता अमित शाह यांची सभा निश्चित झाल्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या गोव्यातील जाहीर सभेची शक्यता मावळली आहे. दरम्यान दि. २५ रोजी भाजपचे नेते विनोद तावडे यांचीही सभा गोव्यात होणार आहे, अशी माहिती पक्षाकडून देण्यात आली.
 

Web Title: amit shah rally in goa for lok sabha election 2024