मतदारांवर काळाचा घाला, ट्रॅक्टरच्या अपघातात तिघांचा मृत्यू तर 9 जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 15:21 IST2019-04-11T15:20:23+5:302019-04-11T15:21:31+5:30
देसाईगंज तालुक्यातील शंकरपूर मतदान केंद्रावरून मतदान करून परत येताना डोंगर मेंढा गावानजीक ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्याने अपघात झाला

मतदारांवर काळाचा घाला, ट्रॅक्टरच्या अपघातात तिघांचा मृत्यू तर 9 जखमी
गडचिरोली - देशात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान पार पडत आहे. यातच गडचिरोलीमध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. देसाईगंज तालुक्यातील शंकरपूर मतदान केंद्रावरून मतदान करून परत येताना डोंगर मेंढा गावानजीक ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्याने अपघात झाला असल्याची माहिती आहे. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला असून 9 जण गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलिवण्यात आले आहे. मतदान करण्यासाठी ट्रॅक्टरमधून दहा ते बारा जणांना शंकरपूर मतदान केंद्रावर नेण्यात येत होतं. मात्र मतदान झाल्यानंतर पुन्हा घरी परतताना हा दुर्दैवी अपघात झाला आहे. घटनेची माहिती मिळताच देसाईगंज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. जखमींना देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Maharashtra: Three people dead, 9 injured as a tractor overturned near Shankarpur village in Gadchiroli, today. The victims were returning to their village after casting their votes. #LokSabhaElections2019pic.twitter.com/VUOVGjdzJi
— ANI (@ANI) April 11, 2019