कसली हेलिकॉप्टर सवारी? १० किमी पायदळ वारी; बेस कॅम्पवरून जाताना निवडणूक कर्मचाऱ्यांचे हाेतात हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 10:43 AM2024-04-24T10:43:49+5:302024-04-24T10:46:55+5:30

एवढेच नाही तर एकमेकांसाेबत बाेलायचीही मुभा नसते. माेबाइल पूर्णपणे बंद ठेवावे लागतात. १० ते १२ किमी पायदळ चालल्याने कर्मचाऱ्यांचे चांगलेच हाल हाेतात.

Gadchiroli Lok Sabha Election - Election Commission employees walk more than 10 kilometers | कसली हेलिकॉप्टर सवारी? १० किमी पायदळ वारी; बेस कॅम्पवरून जाताना निवडणूक कर्मचाऱ्यांचे हाेतात हाल

कसली हेलिकॉप्टर सवारी? १० किमी पायदळ वारी; बेस कॅम्पवरून जाताना निवडणूक कर्मचाऱ्यांचे हाेतात हाल

दिगांबर जवादे

गडचिराेली : जिल्हा नक्षलदृष्ट्या संवेदनशील आहे. निवडणूक कालावधीत नक्षलवाद्यांकडून काेणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी प्रशासनाकडून पूर्ण खबरदारी घेतली जाते. त्यासाठी निवडणूक कर्मचाऱ्यांना बेस कॅम्पपर्यंत  हेलिकाॅप्टरने नेले जाते. त्यानंतर मात्र पोलिस संरक्षणात कित्येक किलाेमीटर पायदळ प्रवास करून मतदान केंद्र गाठावे लागते. त्यामुळे हेलिकाॅप्टरमध्ये बसण्याच्या आनंदावर काही वेळातच विरजण पडते. तब्बल १० किलोमीटरपेक्षाही अधिक पायपीट या कर्मचाऱ्यांना करावी लागते.  

४ निवडणूक कर्मचारी, २५ पोलिस जवान
निवडणूक कर्मचाऱ्यांना पाेलिसांच्या संरक्षणात नेले जाते. निवडणूक कर्मचारी चारच असतात. मात्र, त्यांच्यासाेबत जवळपास २५ पोलिस व सीआरपीएफ जवान असतात. जाे रस्ता पोलिस विभागाने ठरवून दिला त्याच मार्गाने जावे लागते. विशेष करून पथके रस्त्याने न नेता शेत किंवा जंगलातून नेली जातात. येताना पुन्हा मार्ग बदलला जाताे.

एकमेकांसोबत बोलायचीही नसते मुभा... 
नक्षलदृष्ट्या संवेदनशील असलेल्या मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना तालुक्यावरून बेस कॅम्पपर्यंत हेलिकाॅप्टरने नेले जाते. येथपर्यंतचाच प्रवास सुखाचा असते. त्यानंतर पोलिस संरक्षणात पायदळ प्रवास सुरू हाेतो. बेस कॅम्पपासून मतदान केंद्र १० किमीपेक्षा जास्त दूर असल्यास मध्यंतरी विश्रांतीसाठी मुक्काम करावा लागतो. काही काळ विश्राम केल्यानंतर पुन्हा पुढचा प्रवास सुरू हाेतो. यादरम्यान गाेपनीयतेच्या दृष्टीने कधी निघायचे याची काहीच माहिती निवडणूक कर्मचाऱ्यांना दिली जात नाही. एवढेच नाही तर एकमेकांसाेबत बाेलायचीही मुभा नसते. माेबाइल पूर्णपणे बंद ठेवावे लागतात. १० ते १२ किमी पायदळ चालल्याने कर्मचाऱ्यांचे चांगलेच हाल हाेतात.

दुर्गम भागातील मतदान केंद्रावर नियुक्ती झालेल्या कर्मचाऱ्याला तीन ते चार दिवस बाहेर राहावे लागते. बऱ्याचवेळा प्रकृती बिघडण्याचा धोका असते. जंगलात तब्येत बिघडल्यास जीव जाण्याची शक्यता असते. तरुण व सुदृढ कर्मचाऱ्याचीच नेमणूक करावी.- जगदीश केळझरकर, निवडणूक कर्मचारी

Web Title: Gadchiroli Lok Sabha Election - Election Commission employees walk more than 10 kilometers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.