झगमगीत स्टारडम आणि पडद्यामागचे प्रश्न

By Admin | Updated: April 4, 2016 01:51 IST2016-04-04T01:51:39+5:302016-04-04T01:51:39+5:30

हिंदी चित्रपट क्षेत्रातील पडद्यामागच्या अनेक प्रश्नांवर चर्चा होत आहे. टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिच्या आत्महत्येने मनोरंजनाशी निगडित दुनियेतील असे अनेक प्रश्न पुन्हा एकदा समोर आले आहेत

Zodiac stardom and behind the scenes | झगमगीत स्टारडम आणि पडद्यामागचे प्रश्न

झगमगीत स्टारडम आणि पडद्यामागचे प्रश्न

हिंदी चित्रपट क्षेत्रातील पडद्यामागच्या अनेक प्रश्नांवर चर्चा होत आहे. टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिच्या आत्महत्येने मनोरंजनाशी निगडित दुनियेतील असे अनेक प्रश्न पुन्हा एकदा समोर आले आहेत. ही २४ वर्षांची मुलगी आपल्या जीवनाचा शेवट करण्याचा निर्णय अखेर कसा घेऊ शकते? असा प्रश्न या निमित्ताने उभा राहिला आहे. या प्रश्नाचे उत्तर शोधावयाचे झाल्यास मानवी जीवनातील सर्व घटनाक्रम जोडावा लागेल. त्यात मनोरंजनाच्या दुनियेतील मोठे सितारेसुद्धा सामान्य माणसाप्रमाणे त्यांच्यातील दु:ख आणि एकाकीपणा यामुळे घेरलेले दिसून येतात. आपल्या पार्टनरशी झालेल्या मतभेदामुळे प्रत्युषा बॅनर्जी हिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे. तिने नेमके कशामुळे हे टोकाचे पाऊल उचलले हे पोलीस तपासातच निष्पन्न होईल. प्रत्युषा मुंबईत एकटीच राहत होती आणि तिचे कुटुंबीय कोलकात्यात राहत होते. कुटुंबापासून इतके दूर राहते आणि स्टारडममधील जीवनात असलेले ताण-तणाव यांचा कुठेतरी संबंध असलाच पाहिजे. स्टार होण्याचे स्वप्न घेऊन मुंबईत येणाऱ्या सर्वच कलाकारांपैकी काही कलाकारांच्या नशिबात स्टार होण्याचे भाग्य लाभते. त्यानंतर ते स्टारडम टिकवून ठेवण्यासाठी नवीन संघर्ष करावा लागतो. हा संघर्ष पूर्वीच्या संघर्षापेक्षा जास्त कठीण असतो. अशावेळी कुटुंबातील एखादी व्यक्ती आपल्यासोबत राहिली तर दिवसभर केलेला संघर्ष आणि तणाव कुटुंबात आल्यानंतर कुठेना कुठे कमी होतो. कुटुंबाची साथ कोणत्याही माणसाला एकाकीपणात जाण्यापासून रोखू शकते. कधी कधी स्टारडम आणि खासगी जीवनातील संबंध यामुळेही निर्माण होणारा तणाव कुटुंबामुळे निवळला जाऊ शकतो. कदाचित प्रत्युषा आपल्या कुटुंबासोबत राहिली असती तर तिने हे टोकाचे पाऊल कदाचित उचललेही नसते. याबाबत बरेच काही बोलता येईल, पण एक तरुण जीव या दुनियेतून अकाली निघून गेला ही वस्तुस्थिती आहे.

Web Title: Zodiac stardom and behind the scenes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.