तुमचे व्यक्तिमत्त्व ठरवते तुमची स्टाइल
By Admin | Updated: January 6, 2017 05:10 IST2017-01-06T05:10:21+5:302017-01-06T05:10:21+5:30
स्टाइल करताना नेहमीच आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विचार करावा. कारण आपले व्यक्तिमत्त्वच आपली स्टाइल ठरवित असते. बऱ्याचदा असे होते की, आपण इतरांना बघून त्यांची स्टाइल फॉलो करीत असतो

तुमचे व्यक्तिमत्त्व ठरवते तुमची स्टाइल
रुची सवर्ण
स्टाइल करताना नेहमीच आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विचार करावा. कारण आपले व्यक्तिमत्त्वच आपली स्टाइल ठरवित असते. बऱ्याचदा असे होते की, आपण इतरांना बघून त्यांची स्टाइल फॉलो करीत असतो. माझ्या मते, ही बाब पुर्णत: चुकीची आहे. इतरांना फॉलो करण्याऐवजी तुम्ही स्वत:ला ओळखा. कारण स्वत:मध्येच एक स्टाइल दडलेली असते, जी तुम्ही फॉलो करणे अपेक्षित असते. मी स्वत:वर नेहमीच एक्सपिरीमेंटस करीत असते. मला मेकअप करायला खूप आवडते. स्वत:चा चेहरा निखारून वेगवेगळे प्रयोग करणे मला आवडते. मात्र स्टाइल- विषयीच्या सर्व टिप्स मला माझ्या पतीकडून मिळतात. ते फिटनेसविषयी
प्रचंड जागरूक असून, स्टाइल करताना फिटनेस राखणे अत्यावश्यक असल्याचा मला नेहमीच सल्ला देतात. त्याचबरोबर मला सोनाली बेंद्रे आणि सोनम कपूर यांची स्टाइलही खूप प्रभावित करते. कारण सोनम तिच्या स्टाइलवर खूप प्रयोग करीत असते. बऱ्याचदा आपल्याला तिचे कपडे तसेच अंगावरील आभूषणे वेगळ्या धाटणीचे वाटतात. मात्र
तो तिचा स्टाइलचा
भाग असून, त्यात तिचे सौदर्यं उठून दिसते.
मात्र बऱ्याच लोकांचा स्टाइल म्हणजे मेकअप हा समज आहे. माझ्या मते, स्टाइलसाठी मेकअप करायलाच हवा, असे अजिबात नाही. मेकअप
न करताही तुम्ही स्टाइल करू शकता.
मात्र स्टाइल करताना नेहमीच एका गोष्टीची जाणीव ठेवायला हवी, ती म्हणजे तुमच्या भोवतालचे वातावरण बघून, तेथील लोकांचे विचार लक्षात घेऊन तुम्ही स्टाइल करायला हवी.