का वैतागली श्रद्धा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2016 06:12 IST2016-11-12T06:12:58+5:302016-11-12T06:12:58+5:30

बॉलिवूडची ‘बबली गर्ल’ श्रद्धा कपूरचा ‘रॉक आॅन २’ चित्रपटगृहात झळकलाय. अशास्थितीत खरे तर श्रद्धाने खूश असायला हवं. पण ती वैतागलीय.

Wondrous trust? | का वैतागली श्रद्धा?

का वैतागली श्रद्धा?

बॉलिवूडची ‘बबली गर्ल’ श्रद्धा कपूरचा ‘रॉक आॅन २’ चित्रपटगृहात झळकलाय. अशास्थितीत खरे तर श्रद्धाने खूश असायला हवं. पण ती वैतागलीय. आता तिला एवढं वैतागायला तरी काय झालं?असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर श्रद्धाच्या वैतागामागचे कारण वेगळचं आहे. ते म्हणजे दिल्ली. होय, अलीकडे ‘रॉक आॅन २’च्या प्रमोशनसाठी ती दोन दिवस दिल्लीत होती. फरहान अख्तर, अर्जुन रामपाल, पूरब कोहली आणि शशांक अरोरा हे देखील तिच्यासोबत होते. या सगळ्यांना काहीही त्रास झाला नाही पण, श्रद्धाला दिल्लीतील प्रदूषण चांगलचं भोवलं आणि तिची तब्येत बिघडली. मग काय, दिल्लीची वारी अर्धवट सोडून श्रद्धाला घरी परतावं लागलं. ‘रॉक आॅन २’ ची टीम येणार कळाल्यानंतर दिल्लीकरांनी एकच गर्दी केली. मात्र, त्यांच्याशी संवाद साधत असतानाच श्रद्धाला श्वसनाचा त्रास होऊ लागला. दिल्लीतील प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला असताना याच पार्श्वभूमीवर श्रद्धानेही दिल्लीकरांना शुद्ध आणि स्वच्छ दिल्ली बनवायचे आवाहन केले. ‘शुद्ध, स्वच्छ आणि सुरक्षित दिल्लीसाठी थोडेसे प्रयत्न करा,’ असे आवाहन तिने यावेळी दिल्लीकरांना केले.

Web Title: Wondrous trust?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.