अभिनेत्री काजोलला जन्मदिनानिमित्त शुभेच्छा

By Admin | Updated: August 5, 2016 11:21 IST2016-08-05T10:35:53+5:302016-08-05T11:21:33+5:30

अनेक हिंदी चित्रपटांतून आपल्या समर्थ अभिनयाने सगळ्यांची मने जिंकणाऱ्या काजोलचा आज ( ५ ऑगस्ट) जन्मदिवस.

Wishes for Kajolala Birthday Actress | अभिनेत्री काजोलला जन्मदिनानिमित्त शुभेच्छा

अभिनेत्री काजोलला जन्मदिनानिमित्त शुभेच्छा

- संजीव वेलणकर

पुणे, दि. ५ - अनेक हिंदी चित्रपटांतून आपल्या अभिनयाने सगळ्यांची मने जिंकणाऱ्या काजोलचा आज ( ५ ऑगस्ट) जन्मदिवस.

सध्याच्या काळात आघाडीच्या आणि नामांकित अभिनेत्रींमध्ये समावेश होत असलेल्या काजोलचे कुटुंब चित्रपट उदयोगात अनेक वर्षांपासून आहे. आई तनूजा मराठी कुटुंबातली, वडील चित्रपट निर्माते शोमू मुखर्जी बंगाली. मावशी नुतन सर्वाधिक पाच वेळा फिल्म फेअर पुरस्कातर पटकावलेली नामांकित अभिनेत्री. पणजी रतन बाई आणि आजी शोभना समर्थ यांच्या वारशाखाली तयार झालेली काजोल. इतकेच नव्हेी तर काका जॉय मुखर्जी आणि देव मुखर्जी हे देखिल त्यांरच्या काळातील गाजलेले कलावंत. काजोलने 'बेखुदी' या चित्रपटाच्या माध्यामातून जेव्हाट बॉलीवूडमध्ये प्रवेश केला तेव्हा तिच्याह पदरी पडली साफ निराशा. काजोल दिसायला सर्वसामान्य तरुणींसारखीच सामान्यक. पण 'बाजीगर'मध्येश नवख्या शाहरुख सोबत आपल्याय अभिनयाची चुणूक दाखवत तिने बॉलीवूडमधले आपले स्थान पक्का केलेच. या जोडीने नंतर मग अनेक हीट चित्रपट दिले. शाहरुखच्या यशामागे काजोल सोबत जमलेली केमिस्ट्रीफ हा देखिल महत्वांचा विषय म्हपटला पाहिजे.  मात्र त्यानंतरच्या  अनेक चित्रपटात तिने अनेक उल्लेहखनीय भुमिका केल्या . त्याशत हळुवार प्रेमाची अनुभूती देणारी दिलेवाले... मधली सिमरन असो किंवा 'गुप्ते'मधली आक्रमक खलनायिका अनेक चित्रपटात तिने अभिनयाची जादुगरी दाखविली. त्या'नंतर तिने शाहरूख सोबत करण- अर्जुन,दिलवाले दुल्ह.निया ले जायेंगे, कुछ कुद होता है आणि कभी खुशी कभी गम यारखे अनेक हीट चित्रपट केले. त्या‍तील 'दिलवाले...'मध्ये आजही जोरदार गर्दी खेचण्याची क्षमता आहे. . या चित्रपटानेच तिला पहिल्यांदा उत्कृीष्टं अभिनेत्रीचा फिल्म फेअर पुरस्काीरही मिळवून दिला. २४ फेब्रवारी १९९९ मध्ये तिने अभिनेता अजय देवगण सोबत लग्नै केले. बॉलीवूडमध्येा लग्नप झालेल्या हिरोईनचे करीअर नंतर पूर्णतः संपल्यादचे अनेक उदाहरणे आहेत. मात्र लग्नासनंतरही काजोलने पती अजय सोबतही यशस्वीत चित्रपट केले. त्यात कभी खुशी कभी गम या हीट चित्रपटाचाही समावेश आहे. तया चित्रपटासाठी तिला उत्कृष्ट् अभिनेत्रीचे अनेक पुरस्कार मिळाले. तर तिसरा फिल्म फेअर पुरस्कातर ही पटकाविला. आमीर खान सोबत तिने 'फना' हा तर पती अजय सोबत 'यु मी और हम' हा हीट चित्रपट दिला. तर शाहरुखच्या  'ओम शांती ओम'मध्ये  आपल्या नृत्या चे जलवे दाखविले. तिने पतीसोबत चित्रपट निर्मिती व्यवसायातही पाउल टाकले आहे. लोकमत समूहाकडून काजोलला वाढदिवसाच्या  शुभेच्छा.
 

 

Web Title: Wishes for Kajolala Birthday Actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.