काशीबाईसारखी भूमिका पुन्हा करणार नाही!
By Admin | Updated: December 21, 2015 01:50 IST2015-12-21T01:50:07+5:302015-12-21T01:50:07+5:30
बाजीराव मस्तानी स्टार प्रियंका चोप्रा नेहमी महिलांच्या समानतेसाठी उभी असते. पण तिने बाजीरावची पहिली पत्नी काशीबाईची भूमिका केली आहे.

काशीबाईसारखी भूमिका पुन्हा करणार नाही!
बाजीराव मस्तानी स्टार प्रियंका चोप्रा नेहमी महिलांच्या समानतेसाठी उभी असते. पण तिने बाजीरावची पहिली पत्नी काशीबाईची भूमिका केली आहे. मस्तानी जेव्हा तिच्या आणि बाजीरावच्या आयुष्यात आली तेव्हा तिच्या वैवाहिक आयुष्यावर आभाळच कोसळले होते. प्रियंका चोप्रा म्हणते, ‘मी काशीबाईसारखी भूमिका पुन्हा करणार नाही. कारण, खरंतर मला तिच्याबद्दल खूपच वाईट वाटते. तिचे कॅरेक्टर करताना माझ्या हृदयावर खूप ताण पडला. जी व्यक्ती आपली पहिली पत्नी असताना दुसऱ्या युवतीशी लग्न करते तेव्हा पहिल्या पत्नीने काय करावे? मी २१व्या शतकातील युवती असून, मला कोणी एखाद्या महिलेसोबत असे वागलेले आवडणार नाही. त्यामुळे माझ्या विचारशैलीच्या अगदी बाहेरचे हे वागणे आहे. ’