निर्माता बनणार नाही : सुरवीन
By Admin | Updated: September 3, 2014 23:37 IST2014-09-03T23:37:15+5:302014-09-03T23:37:15+5:30
‘हेट स्टोरी-2’मध्ये बोल्ड लूकमध्ये दिसलेली सुरवीन चावला आता निर्मिती क्षेत्रत आपला हात अजमावणार असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी होती.

निर्माता बनणार नाही : सुरवीन
‘हेट स्टोरी-2’मध्ये बोल्ड लूकमध्ये दिसलेली सुरवीन चावला आता निर्मिती क्षेत्रत आपला हात अजमावणार असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी होती. तिने मात्र या बातम्या खोटय़ा असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. अद्याप निर्माता बनण्याची काहीही योजना नसल्याचे सुरवीनने स्पष्ट केले आहे. ‘भूतनाथ रिटर्न्स’चे दिग्दर्शक नितेश तिवारी यांची पत्नी अश्विनी अय्यरच्या नील या चित्रपटातून निर्मिती क्षेत्रत सुरवीन पदार्पण करणार असल्याचे सांगण्यात आले होते. सुरवीनला याबाबत विचारण्यात आले, तेव्हा तिने ही बाब नाकारली. ती म्हणाली, ‘मी एवढय़ात निर्माता बनणार नाही. मी फक्त माङया अॅक्टिंग करिअरवर लक्ष देत आहे. माझा बॉलीवूड प्रवास आताच सुरू झाला आहे आणि माङयाकडे इतर कोणत्याही कामासाठी सध्या वेळ नाही, माङया डोक्यात एवढी जागाही नाही. मी जर असे काही केले, तर त्याची बातमी मी स्वत: देईन.’