या महिन्यात होणार युवराज - हेझलचा साखरपुडा?

By Admin | Published: November 4, 2015 05:23 PM2015-11-04T17:23:03+5:302015-11-04T17:25:32+5:30

भारताचा स्टार खेळाडू युवराज सिंग आणि अभिनेत्री हेजल कीच यांचा येत्या नोव्हेंबरमध्ये साखरपुडा होणार असल्याचे वृत्त आहे.

Will this month be Yuvraj - the hedgehog? | या महिन्यात होणार युवराज - हेझलचा साखरपुडा?

या महिन्यात होणार युवराज - हेझलचा साखरपुडा?

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ४ - भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंगच्या लग्नानंतर आता भारताचा आणखी एक 'एलिजेबल बॅचलर' बोहल्यावर चढण्यास सज्ज झाला आहे. भारताचा स्टार खेळाडू युवराज सिंग आणि अभिनेत्री हेजल कीच यांचा येत्या नोव्हेंबरमध्ये साखरपुडा होणार असून पुढील वर्षी फेब्रुवारीत ते  लग्नगाठीत अडकणार असल्याचे वृत्त आहे.
बॉडीगार्ड चित्रपटात करीना कपूरसोबत महत्वाची भूमिका निभावणारी हेजल आणि युवराजचे प्रेमप्रकरण गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. युवराजची आत्तापर्यंत अनेक प्रेमप्रकरणं गाजली आहेत, मात्र हेजलबाबत तो खूप सीरिअस आहे. हरभजन सिंग आणि गीता बसराच्या लग्नातही हे दोन लव्हबर्ड्स एकत्र दिसले होते. आता दोघांच्या घरच्यांनीही त्यांच्या लग्नाला मान्यता दिल्याने नोव्हेंबर अखेरीसपर्यंत पंजाबी पद्धतीने त्यांचा साखरपुडा ( रोका) पार पडणार असून पुढील वर्षी फेब्रुवारीत ते विवाहबद्ध होणार असल्याचे समजते.
ब्रिटीश अभिनेत्री असलेल्या हेजलने सलमान -करीनाच्या बॉडीगार्ड चित्रपटात महत्वाटची भूमिका केली होती. तसेच बिग बॉस-७, झलक दिखला जा आणि कॉमेडी सर्कस अशा अनेक लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्येही ती सहभागी झाली होती. 

Web Title: Will this month be Yuvraj - the hedgehog?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.