वैभव होणार ‘आर.जे.’

By Admin | Updated: December 17, 2015 01:41 IST2015-12-17T01:41:24+5:302015-12-17T01:41:24+5:30

मराठीचा ‘कॉफी बॉय’ म्हणून तरुणींमध्ये सुपरिचित झालेला आणि ‘बाजीराव-मस्तानी’मध्ये बाजीराव पेशव्यांचे लहान भाऊ चिमाजीअप्प्पांच्या भूमिकेमधून बॉलिवूडमध्ये प्रवेश

Will be glory 'rj' | वैभव होणार ‘आर.जे.’

वैभव होणार ‘आर.जे.’

मराठीचा ‘कॉफी बॉय’ म्हणून तरुणींमध्ये सुपरिचित झालेला आणि ‘बाजीराव-मस्तानी’मध्ये बाजीराव पेशव्यांचे लहान भाऊ चिमाजीअप्प्पांच्या भूमिकेमधून बॉलिवूडमध्ये प्रवेश करणारा सर्वांचा लाडका वैभव लवकरच ‘आर.जे.’ होणार आहे... फसलात ना, आता काय तो करिअर बदलतोय की काय, असे वाटले ना तुम्हाला... हो तो आर.जे. होणार म्हणजे अहो ते चित्रपटात... हे वर्ष वैभवला खूपच भारी गेले... ‘कॉफी आणि बरंच काही’नंतर थेट संजय लीला भंसाळींच्या चित्रपटापर्यंत त्याने उडी घेतली... नवीन वर्षाची सुरुवात ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’पासून होत आहे. अजून काय हवंय एखाद्या कलाकाराला! वैभव मूळचा नागपूरचा. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असतानाच त्याला अ‍ॅक्टिंगमध्ये रस निर्माण झाला. नागपूरला विविध स्पर्धा आणि नाटकांमधून त्याने अभिनयात नाव कमावले. घरच्यांच्या पाठिंब्याने तो मराठी चित्रपटसृष्टीकडे वळला. ‘सुराज्य’ हा त्याचा पहिला चित्रपट; पण त्याला खरी ओळख मिळवून दिली ती ‘कॉफी आणि बरचं काही’ने. त्यात त्याची आणि प्रार्थना बेहरेची आॅनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावली... रिअल लाईफमध्येदेखील त्यांचे ‘गुटरगूँ’ सुरू असल्याची चर्चा आहे. अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारा वैभव आर.जे.मधून काय धमाल घडवतोय ते पाहू या!

Web Title: Will be glory 'rj'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.