करणला का वाटते भीती?

By Admin | Published: January 4, 2017 02:10 AM2017-01-04T02:10:48+5:302017-01-04T02:10:48+5:30

रोमँटिक आणि ड्रामा चित्रपटासाठी प्रसिद्ध असलेल्या करण जोहरने अनेक दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली आहे. तो आपल्या चित्रपटातून गंभीर विषयावर मत का मांडत नाही?

Why do fear of Karan? | करणला का वाटते भीती?

करणला का वाटते भीती?

googlenewsNext

रोमँटिक आणि ड्रामा चित्रपटासाठी प्रसिद्ध असलेल्या करण जोहरने अनेक दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली आहे. तो आपल्या चित्रपटातून गंभीर विषयावर मत का मांडत नाही? याबाबत त्याच्यावर टीका करण्यात येते. याचा खुलासा खुद्द करण जोहरनेच केला आहे. आपल्या चित्रपटात गंभीर विषयावर चर्चा करण्याची भीती वाटत असल्याचे मत त्याने व्यक्त केले आहे. करण जोहर याने एका कार्यक्रमात आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. चित्रपटात गंभीर विषयांवर चर्चा करताना करण जोहर म्हणाला, ‘माझी विचारधारा उदारमतवादी आहे आणि ती तशीच राहील. मात्र, मला हे विचार स्वतंत्रपणे व्यक्त करताना भीती वाटते. मी अनेक गोष्टींचा विचार करताना तो आधुनिक व विकसित पद्धतीने करतो. मी त्याची अनुभूती करू शकतो, त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही. मला असे वाटते की, मी अशा पाशवी मानसिकतेच्या मूक समाजात सामील झालो आहे. मला आपल्या चित्रपटातून एखाद्या विषयावर मत व्यक्त करताना अधिक भीती वाटते जेव्हा माझा चित्रपट रिलीज होत असतो. मी या पृथ्वीवरील सर्वाधिक जोखिम असलेला व सर्वाधिक असुरक्षित व्यक्ती आहे.’

Web Title: Why do fear of Karan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.