'तैमूर'च्या वादाबद्दल काय म्हणाली करीना...?

By Admin | Updated: February 7, 2017 15:07 IST2017-02-07T13:46:38+5:302017-02-07T15:07:43+5:30

अभिनेत्री करीना कपूरचा मुलगा जन्माच्या पहिल्या दिवसापासून चर्चेत आला तो त्याच्या नावामुळे. जन्मानंतर सैफ-करीनाने 'तैमूर' असे मुलाचे नामकरण केले.

What does Karina say about 'TIMUR' controversy? | 'तैमूर'च्या वादाबद्दल काय म्हणाली करीना...?

'तैमूर'च्या वादाबद्दल काय म्हणाली करीना...?

tyle="text-align: justify;"> ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7 - अभिनेत्री करीना कपूरचा मुलगा जन्माच्या पहिल्या दिवसापासून चर्चेत आला तो त्याच्या नावामुळे. जन्मानंतर सैफ-करीनाने 'तैमूर' असे मुलाचे नामकरण केले. सोशल मीडियावर या नावावरुन बराच वादही झाला. काही जणांनी हे नाव क्रूर मुगल शासकाशी जोडले. सैफ, कुटुंबिय, मित्र परिवार आणि चाहत्यांनी तैमूर नावाचे जोरदार समर्थन केले. 
 
पण हा सर्व वाद सुरु असताना करीना कपूर शांत होती. मात्र आता तिने या वादावर मौन तोडले आहे. तैमूर नावावरुन वाद होणे विचित्र आहे. माझ्या मुलाचे नाव लोक इतके मनाला का लावून घेतात ? ते समजत नाही. 
 
तैमूर नावाचा जिवंत अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. तैमूर या शब्दाचा अर्थ अरबी भाषेत लोह असा होतो असे करीनाने सांगितले. वादाच्यावेळी साथ दिल्याबद्दल तिने मित्रपरिवार आणि कुटुंबियाचे आभार मानले. 
 

Web Title: What does Karina say about 'TIMUR' controversy?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.