विक्रमचा ‘विक्रम’
By Admin | Updated: December 30, 2014 23:07 IST2014-12-30T23:07:26+5:302014-12-30T23:07:26+5:30
तामिळ स्टार विक्रम चियान ‘आय’ हा चित्रपट करतोय. हा प्रादेशिक चित्रपट असून त्याचे बजेट १०० कोटींहून अधिक आहे. यात विक्रमला तीन भूमिका साकारायच्या आहेत.

विक्रमचा ‘विक्रम’
तामिळ स्टार विक्रम चियान ‘आय’ हा चित्रपट करतोय. हा प्रादेशिक चित्रपट असून त्याचे बजेट १०० कोटींहून अधिक आहे. यात विक्रमला तीन भूमिका साकारायच्या आहेत. एक अगदी बारीक माणसाची, एक अतिशय सशक्त माणसाची आणि एक जनावराची ! त्यासाठी त्याने वजन गरजेप्रमाणे ११० किलोपर्यंत वाढवले तर अगदी ४० किलोने कमीही केले. त्यात टक्कलही केले. भूमिका गुप्त राखण्यासाठी त्या काळात सहा महिने सूर्यदर्शन केले नाही़ वजन राखण्यासाठी सलग दोन वर्षे एका खोक्यात झोपला आणि फक्त ट्युबमधून द्रव आहार घेतला.