विक्रम-सुहासिनी एकाच चित्रपटात
By Admin | Updated: May 1, 2017 05:33 IST2017-05-01T05:33:53+5:302017-05-01T05:33:53+5:30
देव देव्हाऱ्यात नाही या चित्रपटाद्वारे सुहासिनी मुळ्ये आणि विक्रम गोखले यांची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे

विक्रम-सुहासिनी एकाच चित्रपटात
देव देव्हाऱ्यात नाही या चित्रपटाद्वारे सुहासिनी मुळ्ये आणि विक्रम गोखले यांची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या दोघांनी नेहमीच मालिका आणि चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारून प्रेक्षकांवर छाप पाडली आहे. मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतदेखील त्या दोघांनी आपले एक वेगळे प्रस्थ निर्माण केले आहे. ते दोघे आता देव देव्हाऱ्यात नाही, या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच एकत्र काम करताना दिसणार आहेत. प्रवीण बिर्जे यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून हा चित्रपट एका सत्यघटनेवर आधारित आहे. याची कथा, पटकथा तसेच संवाद आशिष देव यांनी लिहिले आहे. विक्रम गोखले आणि सुहासिनी मुळये या दिग्गज जोडीबरोबरच यात अभिनेत्री रीना अग्रवालदेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अस्सल कौटुंबिक मेलो ड्रामा असणाऱ्या या चित्रपटाच्या चित्रीकरणाला येत्या मे महिन्यापासून सुरुवात होत आहे.