"विक्रम" लवकरच पडद्यावर
By Admin | Updated: March 31, 2017 05:10 IST2017-03-31T05:10:09+5:302017-03-31T05:10:09+5:30
चेहऱ्यावरील हावभाव, डोळ्यांतून व्यक्त होणाऱ्या भावना आणि तितकीच प्रभावी संवादफेक यामुळे रसिकांच्या मनात अढळ स्थान

"विक्रम" लवकरच पडद्यावर
चेहऱ्यावरील हावभाव, डोळ्यांतून व्यक्त होणाऱ्या भावना आणि तितकीच प्रभावी संवादफेक यामुळे रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवणारे कलाकार म्हणजे अभिनेता विक्रम गोखले. मराठी सिनेमा आणि रंगभूमी गाजवणाऱ्या या कलाकाराने हिंदीतही वेगळी छाप पाडली आहे. त्यांच्या रक्तातच अभिनय भिनलेला आहे. मराठी हिंदी सोबतच त्यांनी गुजराती भाषेतही काम करत आपल्यातील कलावंतला अधिक प्रगल्भ केले.अभिनयाच्या क्षेत्रात वावरत असताना विक्रम गोखले यांनी सामाजिक बांधिलकीही जपली. त्यामुळे विक्रम गोखले यांच्या अभूतपूर्व अशा या कारकिर्दीचा आढावा लवकरच माहितीपटामधून घेतला जाणार आहे.या माहितीपटाची संकल्पना आणि दिग्दर्शन विवेक वाघ करीत आहेत. शेखर ढवळीकर लिखित या माहितीपटातून विक्रम गोखले यांच्या अभिनयाची प्रदीर्घ कारर्कीद रसिकांसमोर सादर केली जाणार आहे. खुद्द विक्रम गोखले आपल्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न या माहितीपटातून करताना दिसतील. अभिनयाचा वारसा लाभलेल्या विक्रम गोखले या विक्रमी कलावंताचा हा माहितीपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.