विद्याला करायचेय मराठीत पदार्पण
By Admin | Updated: August 29, 2015 02:49 IST2015-08-29T02:49:48+5:302015-08-29T02:49:48+5:30
जसे मराठीला सुगीचे दिवस आले आहेत, तसे बॉलीवूड मंडळींनाही मराठी चित्रपटांची भुरळ पडू लागली आहे. हेच घ्या ना, रितेश देशमुखने स्वत: ‘लय भारी’मध्ये मुख्य भूमिका साकारली आहे

विद्याला करायचेय मराठीत पदार्पण
जसे मराठीला सुगीचे दिवस आले आहेत, तसे बॉलीवूड मंडळींनाही मराठी चित्रपटांची भुरळ पडू लागली आहे. हेच घ्या ना, रितेश देशमुखने स्वत: ‘लय भारी’मध्ये मुख्य भूमिका साकारली आहे आणि त्यात सुपरस्टार सलमान खानला गेस्ट अपिअरन्स देण्यात आला. तर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘हायवे - एक सेल्फी आरपार’मध्ये हुमा कुरेशी आणि टिस्का चोप्रा यांनीही काम केले आहे. या सगळ्यांनंतर विद्या बालनलाही मराठी चित्रपटांमध्ये काम करायची इच्छा आहे बरं. महत्त्वाचे म्हणजे ती सांगते, ‘मला केवळ मराठी चित्रपटात मुख्य भूमिका साकारायची नसून त्यासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळवायचा आहे.’ बघू या, आता विद्या बालनची इच्छा कधी पूर्ण होतेय ते?