Video Viral : बिकिनी गर्लसोबत स्वामी ओमने धरला ठेका!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2017 22:10 IST2017-05-04T16:40:00+5:302017-05-04T22:10:00+5:30

आपल्या विक्षिप्त स्वभावामुळे ‘बिग बॉस’च्या घरातून हकालपट्टी करण्यात आलेले स्वयंघोषित बाबा स्वामी ओम चर्चेत राहण्यासाठी काही करतील हे सांगणे मुश्कीलच म्हणावे लागेल.

Video Viral: Swami Om has contracted with Bikini Girl! | Video Viral : बिकिनी गर्लसोबत स्वामी ओमने धरला ठेका!!

Video Viral : बिकिनी गर्लसोबत स्वामी ओमने धरला ठेका!!

ल्या विक्षिप्त स्वभावामुळे ‘बिग बॉस’च्या घरातून हकालपट्टी करण्यात आलेले स्वयंघोषित बाबा स्वामी ओम चर्चेत राहण्यासाठी काही करतील हे सांगणे मुश्कीलच म्हणावे लागेल. कधी रेल्वेस्टेशनवर तर कधी टीव्ही चॅनलवर धुमाकूळ घालतानाचे बाबाचे कारनामे प्रेक्षकांनी बघितले आहेत. आता पुन्हा असाच काहीसा विचित्र कारनामा करीत असतानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला असून, त्यामध्ये स्वामी ओमचा एका बिकिनी घातलेल्या मुलींसोबत डान्स करताना दिसत आहे. 

बिग बॉस सीझन-१० चे स्पर्धक राहिलेल्या स्वामी ओमने घरातील महिला स्पर्धकांशी अतिशय लाजिरवाणी अशी वर्तणूक केली आहे. त्यामुळे त्यांची बिग बॉसच्या घरातून हकालपट्टी करण्यात आली होती. स्वामी ओम जेवढे घरात वादग्रस्त होते, तेवढेच बाहेरील दुनियेतही वादग्रस्त असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये स्वामी ओम कधी ध्यानस्थ तर कधी डान्स करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये त्यांच्यासोबत एक मुलगी बघावयास मिळत असून, ती बिकिनी परिधान करून त्यांचे ध्यान भंग करण्याचा प्रयत्न करीत आहे. 



यासाठी ती विचित्र असे हावभाव करून स्वामी ओमच्या मागे-पुढे डान्स करीत आहे. व्हिडीओच्या बॅकग्राउंड म्युझिकमध्ये ‘चल संन्यासी मंदिर में’ हे गाणे ऐकावयास मिळत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत बºयाचशा लोकांनी बघितला असून, त्यामुळे स्वामी ओम पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार व्हिडीओमधील मुलगी मुंबई येथील अनाम खान नावाची मॉडेल आहे. काही दिवसांपूर्वीच स्वामी ओम एका महिलेला त्रास देत असल्याच्या वृत्तामुळे चर्चेत होते. 

Web Title: Video Viral: Swami Om has contracted with Bikini Girl!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.