VIDEO: रितेश म्हणतोय 'थँक गॉड बाप्पा आपल्यासारखा नसतो'

By Admin | Published: September 1, 2016 11:26 AM2016-09-01T11:26:05+5:302016-09-01T13:03:34+5:30

पारंपारिक पद्धतीने साजरा होणारा गणेशोत्सव काळानुरूप कसा बदलत गेला हेच नेमकं सांगतोय आपला लाडका मराठी अभिनेता रितेश देशमुख

VIDEO: Riteish says 'Thank you God is not like you' | VIDEO: रितेश म्हणतोय 'थँक गॉड बाप्पा आपल्यासारखा नसतो'

VIDEO: रितेश म्हणतोय 'थँक गॉड बाप्पा आपल्यासारखा नसतो'

googlenewsNext
- ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 1 - गणेशोत्सवाची लगबग सुरु झाली आहे. आपल्या लाडक्या गणरायाचं स्वागत करण्यासाठी गणेशभक्त सज्ज झाले आहेत. 'गणपती बाप्पा मोरया' म्हणत स्वागत करणा-या आपल्या गणेशाचं 'पुढच्या वर्षी लवकर या' म्हणत विसर्जन केलं जात. गणेशोत्सवाचे हे 11 दिवस जितका आनंद, उत्साह देतात तितका कदाचित कधीच मिळत नसावा. मात्र लोकमान्य टिळकांनी सुरु केलेला गणेशोत्सव आजही त्याच उद्देशाने साजरा केला जात आहे का...पारंपारिक पद्धतीने साजरा होणारा गणेशोत्सव काळानुरूप कसा बदलत गेला हेच नेमकं सांगतोय आपला लाडका मराठी अभिनेता रितेश देशमुख. 
 
रितेश देशमुखचा 'थँक गॉड बाप्पा आपल्यासारखा नसतो' हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. खरंतर रितेशने आपल्या स्टाईलप्रमाणे कॉमेडी करत हा व्हिडिओ सादर केला आहे. पण हा व्हिडिओ खरंतर गपणती आणि माणसांमधला फरक सांगण्याचा प्रयत्न करतो. गणपती आपल्यासारखा नसतो म्हणून त्याचे आभार मानणा-या रितेश देशमुखने व्हिडिओच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. 

 
गणेशोत्सव जवळ आल्याने हा व्हिडिओदेखील व्हायरल होऊ लागला आहे. हे गाणं जरी मराठीत असलं तरी अमराठी लोकांपर्यंतही हा संदेश पोहोचेल हे नक्की. कपिल सावंत यांनी या व्हिडिओचं दिग्दर्शन केलं असून रितेशची पत्नी जेनिलिया डिसूजा आणि स्टार प्रवाहने या व्हिडिओची निर्मिती केली आहे. 
 
रितेशच्या या व्हिडिओचं बॉलिवूडमधूनही कौतुक होत आहे. अनेक कलाकारांनी ट्विटरच्या माध्यमातून रितेशला शुभेच्छा दिल्या आहेत.
 

Web Title: VIDEO: Riteish says 'Thank you God is not like you'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.