VIDEO : बाहुबली-2चा नवीन मोशन पोस्टर रिलीज
By Admin | Updated: February 24, 2017 14:06 IST2017-02-24T13:55:30+5:302017-02-24T14:06:59+5:30
महाशिवरात्रीच्या निमित्ताने शुक्रवारी 'बाहुबली- द कनक्ल्युझन' सिनेमाचा नवा पोस्टर आणि व्हिडीओ रिलीज करण्यात आला आहे.

VIDEO : बाहुबली-2चा नवीन मोशन पोस्टर रिलीज
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - महाशिवरात्रीच्या निमित्ताने शुक्रवारी 'बाहुबली- द कनक्ल्युझन' सिनेमाचा नवा पोस्टर आणि व्हिडीओ रिलीज करण्यात आला आहे. सिनेमाचे दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांनी आपल्या ट्विटर आणि फेसबुक अकाऊंटवर पोस्टर आणि व्हिडीओ शेअर केले आहे. 'बाहुबली- द कनक्ल्युझन' चा नवा पोस्टर सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात शेअर करण्यात येत आहे.
2015 मधील सुपरडुपर हिट सिनेमा बाहुबलीचा सिक्वेल 'बाहुबली- द कनक्ल्युझन' या सिनेमाची सिनेरसिक आतुरतेने वाट पाहत आहेत. महाशिवरात्रीच्या दिवशीची शेअर करण्यात आलेल्या या पोस्टरमध्ये 'बाहुबली- द कनक्ल्युझन' सिनेमातली मुख्य भूमिका असलेला अभिनेता प्रभास सुवर्ण रंग असलेला हत्तीच्या सोडेंच्या सहाय्याने त्याच्या मस्तकावर उभे राहण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
65 दिवसांनंतर 'बाहुबली- द कनक्ल्युझन' सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. येत्या 28 एप्रिलला हा सिनेमा 4 भाषांमध्ये सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दोन वर्षांपासून सिनेमाच्या दुस-या भागाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, सिनेमात प्रभास, अनुष्का शेट्टी, राणा दग्गुबाती आणि तमन्ना यांच्या मुख्य भूमिका आहेत.