Video: परशाचा "याड" लावणारा डॅशिंग लूक

By Admin | Published: April 14, 2017 04:47 PM2017-04-14T16:47:31+5:302017-04-14T16:59:23+5:30

सैराट चित्रपटातून घराघरात पोहोचलेला अभिनेता आकाश ठोसर लवकरच नव्या सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

Video: Elusive Dashing Look for "Yad" | Video: परशाचा "याड" लावणारा डॅशिंग लूक

Video: परशाचा "याड" लावणारा डॅशिंग लूक

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - सैराट चित्रपटातून घराघरात पोहोचलेला अभिनेता आकाश ठोसर लवकरच नव्या सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते महेश मांजरेकर हा सिनेमा साकारत आहे.  "एफयू" असं या सिनेमाचं नाव असून आकाशचा या सिनेमातील फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. 
 
सैराट सिनेमात गावातल्या तरूणाची भूमिका साकारणारा परशा या सिनेमात डॅशिंग लूकमध्ये दिसणार आहे. सोशल नेटवर्कींग वेबसाइट फेसबुकवर परशाचा या सिनेमातील लूक रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये आकाश  पांढरं टी-शर्ट आणि त्यावर ब्लॅक जॅकेटमुळे अत्यंत देखणा दिसत असून डोळ्यावर लावलेल्या काळ्या चश्म्यामुळे तो चांगलाच भाव खावून जाणार असंच दिसतंय. 
 
यापुर्वी 10 एप्रिल रोजी बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानने ट्विट करून आकाशच्या नव्या सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज केला होता. 2 जून रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. आकाश ठोसर या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 
 
या सिनेमात आकाशची भूमिका काय असणार याबाबत अजूनपर्यंत मौन पाळण्यात आलेले आहे. या नव्या लूकनंतर सैराट सिनेमातून परशा म्हणून ओळख निर्माण झालेल्या आकाशची सिनेमांमध्ये निरनिराळे विषय हाताळणा-या मांजरेकरांच्या सिनेमात कोणती भूमिका असणार आहे याबाबत चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे.  
 

Web Title: Video: Elusive Dashing Look for "Yad"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.