VIDEO : आझाद खान- आराध्या बच्चन बनले डान्स पार्टनर

By Admin | Updated: January 9, 2017 12:24 IST2017-01-09T11:57:33+5:302017-01-09T12:24:11+5:30

ऐश्वर्याची मुलगी आराध्या आणि आमिरचा मुलगा आझाद हे दोघेही एकाच शाळेतत शिकतात. अॅन्युअल डे समारंभात त्यांनी एकत्र नृत्यही केले.

VIDEO: Azad Khan - Aadha Bachchan became a dance partner | VIDEO : आझाद खान- आराध्या बच्चन बनले डान्स पार्टनर

VIDEO : आझाद खान- आराध्या बच्चन बनले डान्स पार्टनर

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - बॉलिवूडची सौंदर्यवती ऐश्वर्या राय बच्चन आणि मि. परफेक्शनिस्ट आमिर खान .. हे दोघेही यशस्वी कलाकार, त्यांचे चाहतेही लाखोंवर आहेत, मात्र या दोघांनी आत्तापर्यंत एकदाही कोणत्याच चित्रपटात एकत्र काम केलेले नाही.  असं असलं तरी त्यांची मुलं आराध्या आणि आझाद राव खान मात्र एकमेकांचे चांगले मित्र असून डान्स पार्टनरही बनले. आराध्या आणि आझाद, दोघेही धीरुभाई इंटरनॅशनल स्कूलमध्ये एकत्र शिकतात, त्यांच्या शाळेचा अन्युअल डे नुकताच पार पडला. ज्यामध्ये आराध्या- आझाने अनेक गाण्यांवर एकमेकांसाह डान्सही केला. 
आणि हा डान्स पाहण्यासाठी आराध्याचे आई-बाबा ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन तसेच आझादचे वडील, खुद्द आमिर खान हे उपस्थित होते. एवढेच नव्हे तर शाळेच्या अध्यक्ष नीता अंबानीही त्यांच्यासह पहिल्या रांगेत बसून मुलांना प्रोत्साहन देत होत्या. आपल्या लेकीला नाचताना पाहून मम्मी, ऐश्वर्याही खूप खुश झाली आणि तिने त्या डान्सेच शूटिंगही केले. इतकेच नव्हे तर कार्यक्रम संपता संपता ऐश्वर्या आणि अभिषेकला राहवले नाही आणि त्यांनीही स्टेजवर जाऊन लहान मुलांसोबत डान्स केला.
सोशल मीडियावर या फंक्शनचे व्हिडीओ व्हायरल झाले असून त्याला मोठ्या प्रमाणात लाइक्स मिळत आहेत. 

Web Title: VIDEO: Azad Khan - Aadha Bachchan became a dance partner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.