शाकाहारी सुनीलला घडला उपवास
By Admin | Updated: May 18, 2015 23:18 IST2015-05-18T23:18:29+5:302015-05-18T23:18:29+5:30
अनेकदा वेगवेगळ्या एक्सक्लुझिव्ह आॅफर्सना ग्राहक बळी पडतात. अशाच एका आॅफरला अभिनेता सुनील बर्वे फसला गेला आणि त्यामुळे सुनीलला चक्क उपवास घडला आहे.

शाकाहारी सुनीलला घडला उपवास
अनेकदा वेगवेगळ्या एक्सक्लुझिव्ह आॅफर्सना ग्राहक बळी पडतात. अशाच एका आॅफरला अभिनेता सुनील बर्वे फसला गेला आणि त्यामुळे सुनीलला चक्क उपवास घडला आहे. त्याचं झालं असं की, एका विमान कंपनीने बर्वेंना सवलतीत विमान प्रवासाची आॅफर दिली. सुनीलने ती घेतल्यानंतर त्याच्या लक्षात आलं, की यातील जेवण फक्त मांसाहारी आहे आणि शाकाहाराचा नावनिशाणाच नव्हता. सुनीलने तसं नाराजीचं ट्विटही केलं आहे. यापुढे कोणतीही आॅफर घेण्यापूर्वी अनेकदा विचार करू, असंही तो म्हणाला.