वीणा जामकर ‘लालबागची राणी’
By Admin | Updated: July 26, 2015 03:27 IST2015-07-26T03:27:37+5:302015-07-26T03:27:37+5:30
‘बायोस्कोप’मधील मित्रा या शॉर्ट फिल्ममधून सर्वांवरच छाप पाडलेली वीणा जामकर आता ‘लालबागची राणी’ बनणार आहे. ‘टपाल’चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर

वीणा जामकर ‘लालबागची राणी’
‘बायोस्कोप’मधील मित्रा या शॉर्ट फिल्ममधून सर्वांवरच छाप पाडलेली वीणा जामकर आता ‘लालबागची राणी’ बनणार आहे. ‘टपाल’चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या ‘लालबागची राणी’ या चित्रपटातून एका नव्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. मुंबईच्या गेट वे आॅफ इंडियावर हरवलेल्या मुलीचा तिचे आईवडील आणि मित्रमंडळी कसा शोध घेतात, अशी या चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटाचे शूटिंग सध्या सुरू असून वर्षअखेरीपर्यंत चित्रपट बनणार आहे.