बदलापूरमध्ये वरुणचा अँग्री मॅन लूक

By Admin | Updated: November 29, 2014 23:15 IST2014-11-29T23:15:37+5:302014-11-29T23:15:37+5:30

मोठय़ा पडद्यावर वरुण धवन आतार्पयत फक्त रोमँटिक हीरोच्या भूमिकेत दिसला आहे; पण त्याच्या आगामी ‘बदलापूर’ या चित्रपटात त्याचा वेगळाच लूक पाहायला मिळणार आहे.

Varuna's Angrie Man Look in Badlapur | बदलापूरमध्ये वरुणचा अँग्री मॅन लूक

बदलापूरमध्ये वरुणचा अँग्री मॅन लूक

मोठय़ा पडद्यावर वरुण धवन आतार्पयत फक्त रोमँटिक हीरोच्या भूमिकेत दिसला आहे; पण त्याच्या आगामी ‘बदलापूर’ या चित्रपटात त्याचा वेगळाच लूक पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाचे दोन पोस्टर नुकतेच रिलीज झाले आहेत. त्यातील एका पोस्टरवर वरुणचा लूकही जारी करण्यात आला आहे. या पोस्टरमध्ये वरुणला दाढी-मिशा असून तो खूपच रागात दिसत आहे. हा त्याचा रफ आणि डेडली लूक प्रेक्षकांना पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचे नाव आणि वरुणचा हा लूक पाहिल्यानंतर चित्रपटात अनेक अॅक्शन सीन्स पाहायला मिळण्याची शक्यता आहे. वरुणने त्याच्या चॉकलेटी हीरोच्या इमेजपेक्षा वेगळ्या असलेल्या या भूमिकेची निवड केली आहे. त्याची ही भूमिका त्याच्या करिअरसाठी मैलाचा दगड ठरू शकते. चित्रपटात वरुणसह नवाजुद्दीन सिद्दीकी, हुमा कुरैशी, यामी गौतम, दिव्या दत्ता आणि राधिका आपटे यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी 2क् फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.

 

Web Title: Varuna's Angrie Man Look in Badlapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.