वरुणने खाल्ल्या 22 चापटा

By Admin | Updated: July 11, 2014 00:21 IST2014-07-11T00:21:00+5:302014-07-11T00:21:00+5:30

वरुण धवन आणि आलिया भट्ट यांच्या ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनियाँ’ या चित्रपटाची तरुणाई आतुरतेने वाट पाहत आहे.

Varuna has 22 khapata eaten | वरुणने खाल्ल्या 22 चापटा

वरुणने खाल्ल्या 22 चापटा

वरुण धवन आणि आलिया भट्ट यांच्या ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनियाँ’ या चित्रपटाची तरुणाई आतुरतेने वाट पाहत आहे. या चित्रपटातील संगीत सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. चित्रपटाचा हीरो वरुण धवन याला चित्रपटात एक नव्हे, दोन नव्हे, तर तब्बल 22 चापटा खाव्या लागल्या आहेत. स्वत:च्या या चित्रपटाला डीडीएलजेच्या नव्या रूपाचे नाव देणारा वरुण म्हणतो की, मला गर्व आहे की, चित्रपटात सर्वात जास्त 22 वेळा थप्पड खाल्ले. शूटिंगदरम्यान वरुण हैराण होता, कारण जो येई तो त्याला थप्पड मारत असे. एक वेळ तर अशी आली की, त्याने दिग्दर्शकाला विचारले की, मी हीरो आहे की विलेन, जो येतो तो मला मारतो.’ वरुणला सर्वात जास्त चापटा मारल्या त्या आलिया भट्टने. वरुणने याचा बदला आलियाला ऑफस्क्रीन थप्पड मारून घेतला. 

 

Web Title: Varuna has 22 khapata eaten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.