परदेशी चित्रपटात उषा
By Admin | Updated: January 5, 2015 00:06 IST2015-01-05T00:06:09+5:302015-01-05T00:06:09+5:30
धग’ या पहिल्याच सिनेमातून अभिनयाची चुणूक दाखवल्यानंतर अभिनेत्री उषा जाधव आणखी एका वेगळ्या धाटणीच्या सिनेमात दिसणार आहे.

परदेशी चित्रपटात उषा
‘धग’ या पहिल्याच सिनेमातून अभिनयाची चुणूक दाखवल्यानंतर अभिनेत्री उषा जाधव आणखी एका वेगळ्या धाटणीच्या सिनेमात दिसणार आहे. मूळचा भारतीय पण सध्या तिकडेच स्थायिक असलेल्या अभिजित देवनाथ या तरुणाने ‘सॉल्ट ब्रिज’ हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. यात उषासोबत राजीव खंडेलवाल प्रमुख भूमिकेत असणार आहे. हा संपूर्ण सिनेमा आॅस्ट्रेलियात चित्रित होणार आहे. राजीव आणि उषा वगळता बाकी सर्व कलाकार आॅस्ट्रेलियाचेच असणार आहेत.