उपेंद्र झळकणार सेंटिमेंटलमध्ये
By Admin | Updated: March 28, 2017 04:27 IST2017-03-28T04:27:51+5:302017-03-28T04:27:51+5:30
समीर पाटीलने पोस्टर बॉइज, पोस्टर गर्ल यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे

उपेंद्र झळकणार सेंटिमेंटलमध्ये
समीर पाटीलने पोस्टर बॉइज, पोस्टर गर्ल यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्याचे हे दोन्ही चित्रपट बॉक्स आॅफिसवर चांगलेच गाजले. त्यानंतर आता तो सेंटिमेंटल या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटात मुंबई पोलिसांच्या मानसिकतेवर मनोरंजनाच्या अंगाने भाष्य केले जाणार आहे. या चित्रपटात उपेंद्र पोलिसांची भूमिका साकारत असल्याचे कळतेय. याआधी पेज 3 मध्ये एका पोलिसाची भूमिका त्याने साकारली होती. पण सेंटिमेंटलमधली त्याची भूमिका या भूमिकेपेक्षा अगदी
विरुद्ध आहे.