‘नथुराम’चा दुर्दैवी अंत ही खंत!
By Admin | Updated: February 14, 2016 02:24 IST2016-02-14T02:24:04+5:302016-02-14T02:24:04+5:30
‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक म्हणजे माझा जीव की प्राण आहे. महात्मा गांधी यांच्या हत्येचे समर्थन म्हणून नव्हे तर संपूर्ण नाटकात मांडण्यात आलेला राष्ट्रवादाचा, राष्ट्रप्रेमाचा विचार

‘नथुराम’चा दुर्दैवी अंत ही खंत!
‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक म्हणजे माझा जीव की प्राण आहे. महात्मा गांधी यांच्या हत्येचे समर्थन म्हणून नव्हे तर संपूर्ण नाटकात मांडण्यात आलेला राष्ट्रवादाचा, राष्ट्रप्रेमाचा विचार परावर्तित करण्याच्या दृष्टीने मी गेल्या १४ वर्षांपासून या नाटकावर प्राणापलीकडे प्रेम केले. प्रेक्षकांनी विशेषत: तरुण पिढीने या नाटकावर भरभरून प्रेम केले. ‘नथुराम’चे ८१७ प्रयोग सादर झाले. १००० प्रयोग पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्नांची शिकस्त केली होती. मात्र, राष्ट्रभावना आणि देशप्रेम जागृत करणाऱ्या विचारांचे मोल काही लोकांना न कळल्याने या नाटकाचा दुर्देवी अंत झाला’, अशी खंत ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी ‘लोकमत सीएनएक्स’शी बोलताना व्यक्त केली. ते म्हणाले, ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाच्या रूपाने देशाबाबतचा जाज्वल्य अभिमान तरुणांमध्ये जागृत होत होता. नाटकाला प्रेक्षकांकडून आजतागायत पसंतीची पावती मिळाली आहे. मात्र, वैचारिक आणि तात्विक वाद सहनशीलतेच्या पलीकडे गेल्याने हे नाटक बंद करावे लागले. ही सल आयुष्यभर मनाला टोचत राहील.’
शरद पोंक्षे साकारणार गुलाबराव : ‘पुरुष’ हे जयवंत दळवी यांचे गाजलेले नाटक पुन्हा रंगभूमीवर येत आहे. या नाटकातील ‘गुलाबराव’ ही व्यक्तिरेखा शरद पोंक्षे साकारणार आहेत. अभिनेते नाना पाटेकर यांनी पूर्वी ही भूमिका बजावली होती. ‘पुरुष’चा पहिला प्रयोग २२ सप्टेंबर १९८२ रोजी झाला होता. एप्रिल महिन्यात या नाटकाचा शुभारंभ होणार असून ही व्यक्तिरेखा साकारण्यास अत्यंत उत्सुक असल्याचे पोंक्षे म्हणाले.