सिनेमाच्या शूटिंगसाठी कपिलचं सेटवर बेशुद्धीचं नाटक?
By Admin | Updated: July 11, 2017 12:29 IST2017-07-11T12:29:35+5:302017-07-11T12:29:35+5:30
सेटवर बेशुद्ध पडण्याचा कपिलने बनाव केल्याचं बोललं जातं आहे.

सिनेमाच्या शूटिंगसाठी कपिलचं सेटवर बेशुद्धीचं नाटक?
ऑनलाइन लोकमत
विनयभंगांचा आरोप असलेल्या मल्याळम अभिनेत्याला न्यायलयीन कोठडी
अमरनाथ यात्रा हल्ल्याबाबत अक्षय कुमारनं व्यक्त केला संताप
दारु, सिगारेटमुळे भारताचा पाकविरोधात पराभव - राखी सावंत
वेबपोर्टलच्या वृत्तानुसार, कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार कपिल शर्मा उपचारासाठी दाखल झाल्याची कोणतीही माहिती नाही. त्यामुळे कपिल त्यादिवशी उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये गेला नव्हता. विशेष म्हणजे दुसऱ्य दिवशी तो लोखंडवालामधील जनरल स्टुडिओमध्ये आपल्या "फिरंगी" या आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी गेला होता, असं वृत्त वेबपोर्टलने दिलं आहे. कपिल जर खरंच आजारी होता तर दुसऱ्या दिवशी आपल्या सिनेमाच्या शूटसाठी सेटवर कसा काय पोहोचला? याविषयीची चर्चा सुरू झाली आहे. कपिलला शाहरुख- अनुष्कासोबतच्या एपिसोडपेक्षा "फिरंगी" सिनेमाचं शूटिंग महत्त्वाचं वाटत होतं. त्यामुळेच त्याने आजारी असल्याचं नाटक केलं असावं, असं बोललं जातं आहे.