दोन शत्रू बनले मित्र
By Admin | Updated: July 14, 2014 05:28 IST2014-07-14T05:28:55+5:302014-07-14T05:28:55+5:30
अजय देवगण आणि शाहरुख खान यांच्यातील संबंध विकोपास गेल्याचे सर्वांनाच माहीत आहे; परंतु शत्रुत्व विसरून एकत्र येण्याचा निर्णय या दोघांनी घेतला आहे

दोन शत्रू बनले मित्र
अजय देवगण आणि शाहरुख खान यांच्यातील संबंध विकोपास गेल्याचे सर्वांनाच माहीत आहे; परंतु शत्रुत्व विसरून एकत्र येण्याचा निर्णय या दोघांनी घेतला आहे. ‘सिंघम रिटर्न्स’च्या सेटवर काही दिवसांपूर्वी शाहरुखने अजयला आलिंगन दिले होते. दोघांमधील संबंध आता सुधारले असल्याचे अजयने मान्य केले आहे. ‘माझ्यात आणि शाहरुखमध्ये कसलेही शत्रुत्व नाही. काहीजण तिखट-मीठ लावून अशा बातम्या पेरत असतात. दोघांच्या आगामी चित्रपटांसाठी आम्ही एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘हॅप्पी न्यू ईअर’साठी मी काही दिवसांपूर्वीच शाहरुखला शुभेच्छा दिल्या. हा चित्रपट यशस्वी होईल, असा मला विश्वास आहे, असे अजयने सांगितले. काही दिवसांपूर्वी शाहरुख ‘सिंघम रिटर्न्स’च्या सेटवर आला. अजयसोबत त्याने भरपूर गप्पा मारल्या. २०१२ या वर्षी ‘जब तक है जान’ आणि ‘सन आॅफ सरदार’ हे चित्रपट एकाचवेळी रिलीज झाल्याने शाहरुख आणि अजयमध्ये वाद उफाळला होता. दोघांच्याही चित्रपटावर त्याचा परिणाम झाला होता.