टीव्ही स्टार्सचे डार्लिंग पेट्स!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2023 15:57 IST2017-06-19T03:11:38+5:302023-08-08T15:57:24+5:30

मोठ्या पडद्याबरोबरच छोट्या पडद्यावरील सेलिब्रिटींनाही कशाची ना कशाची आवड असतेच. कुणाला लाँग ड्राइव्हला जायला आवडतं, तर कुणाला चांगले चांगले खाद्यपदार्थ करून खायला आवडतात.

TV stars darling PETS! | टीव्ही स्टार्सचे डार्लिंग पेट्स!

टीव्ही स्टार्सचे डार्लिंग पेट्स!

- Aboli Kulkarni
मोठ्या पडद्याबरोबरच छोट्या पडद्यावरील सेलिब्रिटींनाही कशाची ना कशाची आवड असतेच. कुणाला लाँग ड्राइव्हला जायला आवडतं, तर कुणाला चांगले चांगले खाद्यपदार्थ करून खायला आवडतात. व्यक्ती तितक्या आवडीनिवडी, असा सगळा प्रकार असतो. मग आता हेच पाहा ना, छोट्या पडद्यावर उत्तम कामगिरी बजावणाऱ्या कलाकारांच्या जवळचे त्यांचे घरचे सदस्य नसून त्यांचे पाळीव प्राणी आहेत. पाहूया, कोण आहेत हे स्टार्स ज्यांचे बेस्ट फ्रेंड्स त्यांचे पाळीव प्राणी आहेत...

गुरमीत-डेबिनाचा ‘लकी’
छोट्या पडद्यावरील राम आणि सीता म्हणजे डेबिना बॅनर्जी-गुरमीत चौधरी हे खऱ्या अर्थाने प्राणिप्रेमी आहेत. या दोघांच्या घरी ‘डेक्स्टर’ नावाचा एक कुत्रा आहे. तसेच, त्यांनी एक लॅब्राडोअर घरी आणला असून त्याचे नाव ‘लकी’ असे ठेवले आहे. डेबिनाला लकी तिच्या अपार्टमेंटजवळ आजारी असलेला दिसला. मग ते त्याला घरी घेऊन आले. लकी या दोघांसाठी खरंच लकी ठरला.

शब्बीर अहलुवालियाचा ‘मॅग्नस’
सध्या छोट्या पडद्यावर ज्या टीव्ही कलाकाराची जास्त चलती आहे त्यांपैकी एक म्हणजे शब्बीर. त्यालाही पाळीव कुत्र्यांचे वेड खूप आहे. त्याने त्याच्या कुत्र्याचे नाव ‘मॅग्नस’ असे ठेवले आहे. तो अधूनमधून त्याचे कुत्र्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करीत असतो.

उपेन पटेलचा ‘रोमिओ’
टीव्ही जगतातील सर्वांत हॅण्डसम अभिनेत्यांपैकी एक म्हणजे उपेन पटेल. तो देखील एक पेट लव्हर आहे. त्याने २ कुत्री विकत घेतली असून, एकाचे नाव ‘रोमिओ’ आणि दुसऱ्याचे ‘कॅसानोव्हा’ आहे. पटेलची ही कुत्री त्याची फॅमिली असून तो त्यांच्याशिवाय राहू शकत नाही.

अर्जुन बिजलानीचा ‘बुझी’
अर्जुन बिजलानीचे फॅन्स काही कमी नाहीत. तो खूप मोठा प्राणीप्रेमी आहे. त्याने त्याच्या कुत्र्याचे नाव ‘बुझी’ असे ठेवले आहे. बुझी हा त्याचा बेस्ट फ्रेंड आहे. अर्जुनचे बुझीवरचे प्रेम हे खरंच खूप पवित्र आहे. सोशल मीडियावर त्याने बुझीचे खूप फोटो पोस्ट केले आहेत.
श्वेता साळवेचा ‘लुना’
अभिनेत्री श्वेता साळवे ही मांजर आणि कुत्रा दोघांचीही चाहती आहे. ती केवळ स्वत:कडे असलेल्या पाळीव प्राण्यांनाच जीव लावते असे नाही तर रस्त्यांवरील प्राण्यांना देखील ती प्रेम करते. एखादा प्राणी जर भुकेला असेल तर ती त्यांच्यासाठी खाद्य देखील घेऊन जाते.

रश्मी देसाईचा ‘ओरिओ’
गॉर्जिअस रश्मी देसाई हिच्याकडे ‘ओरिओ’ नावाचा क्यूट
कु त्रा आहे. ती सातत्याने सोशल मीडियावर त्याच्यासोबतचे फोटो पोस्ट करीत असते. ती त्याच्याशिवाय जगूच शकत नाही. ओरिओला ती ‘स्ट्रेस बस्टर’ समजते.

कपिल शर्माचा ‘जंजीर’
एका विनोदी मालिके चा सूत्रसंचालक कपिल शर्मा याची प्रेरणा म्हणजे त्याचा कुत्रा ‘जंजीर’ होय. कपिल जंजीरसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करीत असतो. कपिल शोची स्क्रिप्ट बनवत असताना त्याचा ‘जंजीर’ देखील त्याच्याजवळच असतो. त्याचा कुत्रा म्हणजे त्याचा ‘जीव की प्राण’ आहे.

Web Title: TV stars darling PETS!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.