सर्वाधिक कमाई करणारे बॉलिवूडचे 10 चित्रपट
By Admin | Updated: January 9, 2017 18:39 IST2017-01-09T18:37:16+5:302017-01-09T18:39:45+5:30
बॉलिवूडमध्ये आजच्या घडीला सलमान, आमिर आणि शाहरुख या तीन खानांचे राज्य चालते. त्यांच्या शब्दाला इंडस्ट्रीमध्ये एक वजन आहे.

सर्वाधिक कमाई करणारे बॉलिवूडचे 10 चित्रपट
tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - बॉलिवूडमध्ये आजच्या घडीला सलमान, आमिर आणि शाहरुख या तीन खानांचे राज्य चालते. त्यांच्या शब्दाला इंडस्ट्रीमध्ये एक वजन आहे. या तिघांचे चित्रपट जेव्हा प्रदर्शित होतात त्यावेळी क्वचितच अन्य निर्माते चित्रपट प्रदर्शनाचे धाडस दाखवतात.
अलीकडच्या काहीवर्षात या तिघांच्या चित्रपटांनी केलेल्या कमाईच्या आकडयावर नजर टाकली तर लगेच ही गोष्ट लक्षात येते. हिंदीमध्ये सर्वाधिक कमाई करणा-या दहा चित्रपटांपैकी 9 चित्रपट आमिर, शाहरुख आणि सलमानच्या नावावर आहेत.
2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या हृतिक रोशनच्या क्रिष 3 ने 244 कोटींची कमाई केली. त्याच्या व्यतिरिक्त अन्य कुठलाही नायक या तिघांच्या जवळपासही नाही. 200 कोटींपेक्षा जास्त कमाई करणारे सलमान खानचे 4, आमिर खानचे तीन आणि शाहरुख खानचे दोन चित्रपट आहेत.