अपघाताच्या वेळी सलमान टल्लीच - फॉरेन्सिक तज्ज्ञ

By Admin | Updated: December 3, 2014 13:49 IST2014-12-03T13:49:37+5:302014-12-03T13:49:46+5:30

अपघाताच्या वेळी सलमान खान दारुच्या नशेतच होता. त्याच्या रक्तामध्ये अल्कोहोलचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त होते अशी साक्ष फॉरेन्सिक तज्ज्ञांनी सत्र न्यायालयासमोर दिली आहे.

At the time of the accident, Salman Khan - a forensic expert | अपघाताच्या वेळी सलमान टल्लीच - फॉरेन्सिक तज्ज्ञ

अपघाताच्या वेळी सलमान टल्लीच - फॉरेन्सिक तज्ज्ञ

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ३ -  हिट अँड रनप्रकरणात अभिनेता सलमान खानच्या अडचणीत वाढ होत आहे. अपघाताच्या वेळी सलमान खान दारुच्या नशेतच होता. त्याच्या रक्तामध्ये अल्कोहोलचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त होते अशी साक्ष फॉरेन्सिक तज्ज्ञांनी सत्र न्यायालयासमोर दिली आहे. 
२००२ मधील हिट अँड रन प्रकरणी अभिनेता सलमान खानविरोधात मुंबईतील सत्र न्यायालयात खटला सुरु आहे. या खटल्याच्या सुनावणीत बुधवारी फॉरेन्सिक तज्ज्ञ डी.के. बालाशंकर यांनी साक्ष दिली. रक्तामध्ये सुमारे ३० एमजीपर्यंत अल्कोहोलचे प्रमाण हे सामान्य मानले जाते. पण अपघाताच्या वेळी सलमानच्या रक्तात हे प्रमाण तब्बल ६२ एमजी होते अशी माहिती बालाशंकर यांनी कोर्टाला दिली आहे. यावरुन सलमान दारुच्या नशेत होता हे स्पष्ट होऊ शकते. यामुळे सलमान खान हा गोत्यात आला असून आणखी साक्षीदारांची साक्ष अजूनही सुरु आहे. या सुनावणीसाठी सलमान त्याच्या बहिणींसोबत कोर्टात हजर आहे. 
सलमान खानवर मद्यधूंद अवस्थेत गाडी चालवून पाच जणांना धडक दिल्याचा आरोप आहे. २८ सप्टेंबर २००२ मध्ये वांद्रे येथे झालेल्या या अपघातात एक जण ठार तर चार जण जखमी झाले होते. याप्रकरणी सलमानवर सदोष मनुष्यवधाच्या कलमाखाली खटला सुरु आहे. यामध्ये दोषी आढळल्यास सलमानला १० वर्षांचा तुरुंगाव होऊ शकतो. २४ नोव्हेंबरच्या सुनावणी दरम्यान कोर्टाने डिसेंबर अखेरपर्यंत हा खटला निकाली काढण्याचे निर्देश सरकारी वकिलांना दिले होते. 

Web Title: At the time of the accident, Salman Khan - a forensic expert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.