डिसकाऊंटमध्ये पाकिस्तानी चित्रपटात काम करीन - टायगर

By Admin | Updated: April 26, 2016 13:56 IST2016-04-26T13:56:51+5:302016-04-26T13:56:51+5:30

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ पाकिस्तानी चित्रपटात काम करण्यासाठी प्रचंड उत्सुक आहे. टायगर पाकिस्तानी चित्रपटात भूमिका करण्यासाठी इतका गंभीर आहे.

Tiger will work in Pakistani film in the discounts | डिसकाऊंटमध्ये पाकिस्तानी चित्रपटात काम करीन - टायगर

डिसकाऊंटमध्ये पाकिस्तानी चित्रपटात काम करीन - टायगर

tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. २६ - बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ पाकिस्तानी चित्रपटात काम करण्यासाठी प्रचंड उत्सुक आहे. टायगर पाकिस्तानी चित्रपटात भूमिका करण्यासाठी इतका गंभीर आहे की, उद्या संधी मिळाल्यास तो कमी पैशातही काम करायला तयार आहे. 
 
नुकतचं व्हिडीओ कॉन्फरन्सवरुन लाहोरमध्ये बोलताना टायगर म्हणाला की, मला चांगली संधी मिळणार असेल तर, मी पाकिस्तानी चित्रपटात काम करायला तयार आहे. त्यासाठी मी पाकिस्तानी निर्मात्यांना दहा टक्के सवलतही देईन असे त्याने सांगितले. 
 
पाकिस्तानी चाहत्यांकडून मला भरपूर प्रेम मिळते. पाकिस्तानी चित्रपटात काम करणे ही एकप्रकारे त्या प्रेमाची परतफेड आहे असे टायगरने सांगितले. 
 

Web Title: Tiger will work in Pakistani film in the discounts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.