‘टायगर जिंदा है’ चे चित्रिकरण उद्यापासून अबु धाबीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2017 07:16 PM2017-05-03T19:16:04+5:302017-05-03T19:16:52+5:30

टायगर जिंदा है’ या चित्रपटाच्या चित्रिकरणाला उद्यापासून अबु धाबीमध्ये सुरुवात करण्यात येणार आहे.

'Tiger Jinda Hai' will be filmed from Abu Dhabi tomorrow | ‘टायगर जिंदा है’ चे चित्रिकरण उद्यापासून अबु धाबीत

‘टायगर जिंदा है’ चे चित्रिकरण उद्यापासून अबु धाबीत

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 03 - ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाच्या चित्रिकरणाला उद्यापासून अबु धाबीमध्ये सुरुवात करण्यात येणार आहे. बॉलिवूडचा दबंग खान सलमान आणि अभिनेत्री कॅटरिना कैफ तब्बल पाच वर्षांनी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. 
‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाचे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी अबु धाबीमध्ये चित्रिकरणाला उद्यापासून सुरुवात करणार असल्याचे ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये असे लिहिले की, ‘टायगर जिंदा है’साठी लोकेशन शोधण्याचा शेवटचा दिवस असून उद्यापासून चित्रिकरणाला सुरुवात करणार आहे. पुन्हा एकदा चिंताग्रस्त आणि उत्सुक आहे. 
गेल्या काही दिवसांपूर्वी ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाचे चित्रिकरण मोरॉक्को, व्हिएन्ना आणि मुंबईत करण्यात आले. त्यानंतर आता अबु धाबीमध्ये करण्यात येणार आहे.
‘टायगर जिंदा है’ हा 2012 साली रिलीज झालेल्या ‘एक था टायगर’ या चित्रपटाचा सिक्वल आहे.  या चित्रपटात सलमानसोबत कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यात सलमान खान भारतीय एजेंटच्या भूमिकेत दिसणार आहे तर कॅटरिना कैफ ही पाकिस्तानी एजंटची भूमिका करणार आहे. तब्बल पाच वर्षांनंतर सलमान खान व कॅटरिना कैफ ‘टायगर जिंदा है’ च्या निमित्ताने एकत्र येणार आहेत.
कॅटरिना कैफसाठी हा ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट महत्त्वाचा ठरणार आहे. कॅटरिनाचे मागील तीन चित्रपट फ्लॉप ठरल्याने ‘टायगर जिंदा है’च्या यशामुळे तिच्या करिअरला नवी संजीवनी मिळू शकते. सलमानच्या हा चित्रपटही ब्लॉकबस्टर ठरला व त्याने ३०० कोटीच्यावर बॉक्स  ऑफिस कमाई केली तर नवा रेकॉर्ड त्याच्या नावे लिहिला जाणार आहे. याचवर्षी सलमान खानचा कबीर खान दिग्दर्शित ‘ट्यूबलाईट’ हा चित्रपट ईदला रिलीज होणार आहे. या चित्रपटात सलमान अशा व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे, ज्याला एखाद्या गोष्टीचे ज्ञान उशिरा होते.
दरम्यान, ‘टायगर जिंदा है’ ख्रिसमस पूर्वी 22 डिसेंबर 2016 या तारखेला चित्रपटगृहात रिलीज केला जाणार आहे.